Pune Half Marathon 2022 : यंदाचे तिसरे वर्ष, सोमवारी पत्रकार परिषद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pune Half Marathon 2022

Pune Half Marathon 2022 : यंदाचे तिसरे वर्ष, सोमवारी पत्रकार परिषद

पुणे – सकाळ माध्यम पुरस्कृत तिसऱ्या ‘बजाज अलियान्झ पुणे हाफ मॅरेथॉन’बाबत सोमवारी पुण्यात पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आले आहे. बहुप्रतिक्षित पुणे हाफ मॅरेथॉनमध्ये अनेक नामांकित धावपटू सहभागी होणार आहेत. या धावपटूंसोबत संवाद साधण्याची संधी बजाज अलियान्झ पुणे हाफ मॅरेथॉनच्यावतीने उपलब्ध करून देण्यात येणार आहे. (Half Marathon 2022 news in Marathi)

हेही वाचा: Virat Kohli : 'खाओ पियो ऐश करो...' विराट कोहलीचा लहानपणीचा फोटो व्हायरल

आरोग्य आणि तंदुरुस्तीसाठी सक्रियतेचा संकल्प कृतीत उतरविण्याची प्रेरणा देण्यासाठी देण्यासाठी पुणे हाफ मॅरेथॉनचं आयोजन करण्यात येते. या मॅरेथॉनचा मार्ग, धावपटू कोण असतील, यंदाचं मॅरेथॉनमधील आकर्षण याबाबत माहिती देण्यासाठी येत्या सोमवारी 12 सप्टेंबर रोजी बजाज अलियान्झ पुणे हाफ मॅरेथॉनच्या वतीने पत्रकार परिषदेचं आयोजन कऱण्यात आलं आहे. या पत्रकार परिषदेत मॅरेथॉनमध्ये धावणारे धावपटू उपस्थित राहणार आहे.

हेही वाचा: Marcus Stoinis Injury : भारत दौऱ्यापूर्वी ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का, स्टोयनिस-वॉर्नर बाहेर

दरम्यान, पुण्यात अनेक भागांमध्ये मेट्रोचे काम सुरू आहे. त्यामुळे मॅरेथॉनच्या मार्गात काही बदल करण्यात आले आहेत. बदललेला मार्ग कसा असेल याविषयी पत्रकार परिषदेत माहिती देण्यात येणार आहे. बजाज अलियान्झ पुणे हाफ मॅरेथॉन २०१८ मध्ये सुरू झाली होती. त्यानंतर २०१९ मध्ये देखील या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र कोरोना संसर्गामुळे स्पर्धेत दोन वर्षांचा खंड पडला. आता तिसऱ्या मॅरेथॉन स्पर्धेसाठी धावपटू सज्ज झाले आहेत.

Web Title: Pune Half Marathon 2022 Know Route Runners Details Will Be Revealed On Monday Press Conference

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Pune NewsMarathon