
गत विजेत्या पुणे ग्रामीणसह मुंबई शहर पश्चिम, पुणे शहर यांनी महिला विभागात, तर पुणे ग्रामीण, मुंबई उपनगर पूर्व, कोल्हापूर यांनी पुरुषांमध्ये राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरी गाठली. महिलांच्या उपउपांत्यपूर्व सामन्यात पुणे ग्रामीणने सांगलीला ५४-१६ असे पराभूत करीत उपांत्यपूर्व फेरी गाठली.