
प्रो कबड्डी लीगच्या १२ व्या हंगामाला दमदार सुरुवात झाली आहे. स्पर्धेतील दुसऱ्या लढतीत अस्लम इनामदारच्या नेतृत्वाखाली खेळणारा पुणेरी पलटण आणि अंकुश राठीच्या नेतृत्वाखाली खेळणारा बेंगलुरू बुल्स हे दोन्ही संघ आमनेसामने होते.
एकापेक्षा एक स्टार खेळाडूंची फौज असलेल्या दोन्ही संघात दमदार खेळ पाहायला मिळाला. सामना ३२-३२ ने बरोबरीत सुटला. त्यामुळे टाय ब्रेकरने सामन्याचा निकाल लागला. शेवटी पुणेरी पलटन संघाने टाय ब्रेकरमध्ये ६-४ ने बाजी मारली आणि १२ व्या हंगामात विजयी सलामी दिली.