Manjusha Sahasrabuddhe : मंजूषा सहस्रबुद्धेला तिहेरी मुकुट

पंचकुला येथे नुकत्याच संपलेल्या ४६व्या राष्ट्रीय मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत पुण्याच्या मंजूषा सहस्रबुद्धेने तिहेरी मुकुटाचा मान मिळविला. पंचकुला येथे झालेल्या या स्पर्धेत मंजूषा सहस्रबुद्धेने ६० वर्षांवरील महिलांच्या एकेरी, दुहेरीसह मिश्र दुहेरीचेही जेतेपद पटकावले.
Manjusha Sahasrabuddhe
Manjusha Sahasrabuddhesakal

पुणे : पंचकुला येथे नुकत्याच संपलेल्या ४६व्या राष्ट्रीय मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत पुण्याच्या मंजूषा सहस्रबुद्धेने तिहेरी मुकुटाचा मान मिळविला. पंचकुला येथे झालेल्या या स्पर्धेत मंजूषा सहस्रबुद्धेने ६० वर्षांवरील महिलांच्या एकेरी, दुहेरीसह मिश्र दुहेरीचेही जेतेपद पटकावले.

एकेरीच्या अंतिम लढतीत मंजूषा सहस्रबुद्धेने सुनीता स्वामिनाथन वर २१-१०, २१-७ असा विजय मिळविला. तत्पूर्वी, उपांत्य फेरीत मंजूषा सहस्रबुद्धेने अर्पिता झव्हेरीचा २१-१५, २१-१४ असा पराभव केला होता. महिला दुहेरीच्या अंतिम लढतीत मंजूषा सहस्रबुद्धेने माणिक परांजपेच्या साथीत जेतेपद मिळविताना अंतिम लढतीत अर्पिता झव्हेरी व वॅनेसा परेरा या जोडीचा २१-१९, २१-१५ असा पराभव केला. तत्पूर्वी, उपांत्य फेरीत मंजूषा सहस्रबुद्धे व माणिक परांजपे जोडीने अल्का बात्रा व सुकेशा साग्गी या अव्वल मानांकित जोडीचा २१-८, २१-९ असा पराभव केला होता.

Manjusha Sahasrabuddhe
Pune Metropolitan District Tennis : श्रीमई संतोष, श्रीजा, शरण्याची आगेकूच

तर मिश्र दुहेरीत मंजूषा सहस्रबुद्धेने राम लखनच्या साथीत विजेतेपद पटकावले. अंतिम लढतीत मंजूषा-राम जोडीने सुरेखा साटम व रमेश शर्मा या द्वितीय मानांकित जोडीचा २१-७, २१-१० असा पराभव केला. तत्पूर्वी, उपांत्य फेरीत मंजूषा-राम जोडीने प्रीती लालचंदानी व हरेंद्रसिंह रावत जोडीला २१-५, २१-६ असे पराभूत केले होते.

मिश्र दुहेरीच्या ५५ वर्षे वयोगटात पुण्याच्या राजश्री भावेने आंध्र प्रदेशच्या लिंगेश्वरा रावच्या साथीत जेतेपद पटकावले. अंतिम लढतीत राजश्री भावे व लिंगेश्वरा राव या जोडीने विक्रम भसिन व अमृत कोहली या अव्वल मानांकित जोडीचा २६-२४, २१-१७ असा पराभव केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com