सिंधूने इतिहास रचला; Forbes च्या सर्वात जास्त कमाई करणाऱ्यांच्या यादीत मानाचे स्थान | PV Sindhu Forbes List 2022 highest paid female athlete | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

PV Sindhu Forbes List

Year Ender 2022 : सिंधूने इतिहास रचला; Forbes च्या सर्वात जास्त कमाई करणाऱ्यांच्या यादीत मानाचे स्थान

PV Sindhu Forbes List : फोर्ब्सने जगातील सर्वात जास्त कमाई करणाऱ्या 25 महिला खेळाडूंची यादी जाहीर केली असून त्यात भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू 12 व्या स्थानी आहे. ती या 25 जणांच्या यादीत स्थान मिळवणारी एकमेव भारतीय महिला खेळाडू आहे. ब्राझीलमध्ये 2016 मध्ये झालेल्या ऑलिम्पिकमध्ये रौप्य आणि 2020 मधील टोकियो स्पर्धेत ब्राँझपदक जिंकणाऱ्या सिंधूने यावर्षी 7.1 दशलक्ष अमेरिकन डॉलरची कमाई केली असून त्यापैकी 7 दशलक्ष डॉलर हे तिने बक्षीस रकमेशिवाय इतर माध्यमांतून मिळवले आहेत.

बर्मिंगहॅम येथे यंदाच्या ऑगस्ट महिन्यात झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत तिने एकेरीमध्ये सुवर्ण; तर दुहेरीमध्ये रौप्यपदक जिंकले होते. जपानची आघाडीची टेनिस खेळाडू नाओमीओसाका हिने सलग तीन वर्षे या यादीत पहिले स्थान पटकावले आहे. तिने 2022 मध्ये 51.1 दशलक्ष डॉलरची कमाई केली आहे. या यादीत पहिल्या दहा स्थानापैकी सात खेळाडू या टेनिस खेळणाऱ्या आहेत.

हेही वाचा: Virat Kohli : मेहदीलने बाद केल्यानंतर भडकलेल्या विराटने केली शिवीगाळ; पंच आले म्हणून...

2022 मध्ये सर्वाधिक कमाई करणाऱ्या टॉप 5 महिला खेळाडू

1 - नाओमी ओसाका, जपान, टेनिस, ५१.१ दशलक्ष डॉलर

2 - सेरेना विलियम्स, अमेरिका, टेनिस, ४१.३ दशलक्ष डॉलर

3 - आयलीन म्यू , चीन, स्कीईंग, २०.१ दशलक्ष डॉलर

4 - एमा राडूकानो, इंग्लंड, टेनिस, १८.७ दशलक्ष डॉलर

5 - इगा शिआटेक, पोलंड, टेनिस, १४.९ दशलक्ष डॉलर

12 - पी. व्ही. सिंधू, भारत, बॅडमिंटन, ७.१ दशलक्ष डॉलर (जवळपास 58 कोटी)

टॅग्स :BadmintonPV Sindhu