Virat Kohli : मेहदीलने बाद केल्यानंतर भडकलेल्या विराटने केली शिवीगाळ; पंच आले म्हणून... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Virat Kohli Sledging Bangladesh Cricketer

Virat Kohli : मेहदीलने बाद केल्यानंतर भडकलेल्या विराटने केली शिवीगाळ; पंच आले म्हणून...

Virat Kohli Sledging Bangladesh Cricketer : बांगलादेशने विजयासाठी ठेवलेल्या 145 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची तिसऱ्या दिवसअखेर अवस्था 4 बाद 45 धावा अशी झाली आहे. भारतीची रन मशीन विराट कोहलीने तब्बल 22 चेंडू खेळून 1 धाव केली. तो मेहदी हसनच्या गोलंदाजीवर शॉर्टलेगकडे झेल देऊन माघारी परतला. दरम्यान माघारी परतताना त्याची आणि बांगलादेश क्रिकेटपटूची शाब्दिक वादावादी झाली. यादरम्यान, दोन्हीकडून शिवागाळ देखील झाली.

हेही वाचा: BAN vs IND : रात्र वैऱ्याची! मेहदीने भारताची टॉप ऑर्डर उडवली; 45 धावा करतानाही झाली दमछाक

भारत आणि बांगलादेश यांच्यातील दुसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी भारताला विजयासाठी 145 धावांचे माफक आव्हान मिळाले. मात्र बांगलादेशचा फरकीपटू मेहदी हसन मिराजने भारताची टॉप ऑर्डर अवघ्या 45 धावात उडवत सामन्यावर पकड निर्माण केली. मेहदीने शुभमन गिल(7), चेतेश्वर पुजारा (6) आणि विराट कोहलीची (1) शिकार केली.

विराट कोहली बाद झाला त्यावेळी तो पॅव्हेलियनकडे परतत होता. मात्र त्याचवेळी बांगलादेशच्या क्रिकेटपटूंनी जोरदार सेलिब्रेशन करण्यास सुरूवात केली. याचवेळी बहुदा मुशफिकूर रहीमने विराटला उद्येशून आक्रमक वक्तव्य केले. यावेळी विराट कोहलीने देखील प्रत्युत्तर दिले.

हेही वाचा: Virat Kohli : अजिंक्य रहाणेच हवा होता! विराट कोहलीचे हे व्हर्जन पाहून...

विराट पॅव्हेलियनकडे जाता जाता थांबला. यानंतर बांगलादेशचा कर्णधार शाकिब अल हसन आणि पंत विराटजवळ आहे. त्यानंतर विराटला शांत करून त्यांनी त्याची पाठवणी केली. मात्र जाता जात विराटने आपल्या आक्रमक शैलीत स्लेजिंग केले. विराट कोहलीचे या दौऱ्यावर अनेकवेळा बांगलादेशी क्रिकेटपटूंसोबत मैदानावर खटके उडले आहेत. विराट बांगलादेश फलंदाजी करत असताना टाईमपास करणाऱ्या शांतोला उद्येशून देखील काहीतरी म्हणाला होता.

हेही वाचा: Ind vs Ban 2nd Test Day 3 : भारताचे 4 फलंदाज तंबूत; बांगलादेशची कसोटीवर पकड

भारत आणि बांगलादेश यांच्यातील दुसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी भारताला विजयासाठी 145 धावांचे माफक आव्हान मिळाले. मात्र बांगलादेशचा फरकीपटू मेहदी हसन मिराजने भारताची टॉप ऑर्डर अवघ्या 45 धावात उडवत भारताची आजची रात्र वैऱ्याची ठरवली. मेहदीने शुभमन गिल(7), चेतेश्वर पुजारा (6) आणि विराट कोहलीची (1) शिकार केली. शाकिबने केएल राहुलला बाद केले. आता भारताला उद्या विजयासाठी 100 धावा करायच्या आहेत. भारताचा अक्षर पटेल 26 तर नाईट वॉचमन जयदेव उनाडकट 3 धावा करून नाबाद आहेत.