PV Sindhu : कोच पार्क सांगने सिंधूशी घेतली फारकत; इन्स्टाग्राम पोस्ट करत म्हणाले... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

PV Sindhu

PV Sindhu : कोच पार्क सांगने सिंधूशी घेतली फारकत; इन्स्टाग्राम पोस्ट करत म्हणाले...

PV Sindhu : भारताची स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूचे प्रशिक्षक पार्क सांग यांनी सिंधूपासून फारकत घेतली आहे. याबाबत त्यांनी इन्स्टाग्रावर पोस्ट करत माहिती दिली. पार्क आणि सिंधू यांनी 2019 पासून एकत्र काम करण्यास सुरूवात केली होती. पार्क यांच्या मार्गदर्शनाखाली सिंधूने BWF World Tour विजेतेपदं, सईद मोदी आंतरराष्ट्रीय स्पर्धा, स्विस ओपन आणि सिंगापूर ओपन स्पर्धा जिंकली. याचबरोबर सिंधूने राष्ट्रकुल 2022 स्पर्धेत महिला एकेरीत सुवर्ण पदक देखील जिंकले. तर टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक नावावर केले.

पार्क आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये म्हणतात, 'सर्वांनी हेलो मी सर्वांना हेलो म्हणून खूप काळ झाला. मी हैदराबादमध्ये काही दिवसांपूर्वीच परत आलो आहे. ज्यांनी माझ्या वडिलांविषयी काळजी व्यक्त केली त्या सर्वांचे मी आभार मानतो. खरं सांगायचं झालं तर माझ्या वडिलांची प्रकृती अजून चांगली नाही. त्यामुळे मला भारतात परतताना खूप वेदना होत होत्या.'

पार्क पुढे म्हणाले की, 'मला सिंधू सोबतच्या सहवासाबाबत बोलायचं आहे. तिने गेल्या काही सामन्यात निराशाजनक कामगिरी केली आहे. एक प्रशिक्षक म्हणून याला मी जबाबदार असल्याची माझी भावना आहे. त्यामुळे तिला बदल हवा होता. त्यामुळे ती नवा कोच शोधणार असल्याचे तिने सांगितले.'

'मी सिंधूच्या निर्णयाचा आदर करतो. मी तिच्यासोबत पुढच्या ऑलिम्पिकपर्यंत तिच्यासोबत नसणार याबद्दल दुःख आहे. मात्र मी तिला दुरून पाठिंबा देणार आहे. माला तिच्यासोबतचे सर्व क्षण अजूनही आठवतात. मला ज्यांनी पाठिंबा दिला आणि प्रोत्साहन दिले त्या सर्वांची मी आभार मानतो.'

(Sports Latest News)

हेही वाचा : जाणून घ्या कॉन्ट्रा फंडातल्या गुंतवणुकीबाबत

टॅग्स :BadmintonPV Sindhu