PV Sindhu : पी.व्ही. सिंधू, प्रणोयची आजपासून कसोटी

सिंधूचा पायाचा घोटा मागील वर्षी ऑगस्टमध्ये दुखावला. त्यानंतर या दुखापतीमुळे तिला आंतरराष्ट्रीय स्पर्धांपासून दूरच रहावे लागले.
पी.व्ही. सिंधू,
पी.व्ही. सिंधू, sakal media

PV Sindhu - ओपन बॅडमिंटन स्पर्धेला आजपासून (ता. ६) सुरुवात होत असून या स्पर्धेमध्ये भारताची मदार पी. व्ही. सिंधू व एच. एस. प्रणॉय यांच्या खांद्यावर असणार आहे. सिंधू या स्पर्धेची गतविजेती असून प्रणॉयने मलेशिया मास्टर्स स्पर्धा जिंकून जेतेपदाचा दुष्काळ संपवला होता. तब्बल सहा वर्षांनंतर त्याने अजिंक्यपदाला गवसणी घातली.

पी.व्ही. सिंधू,
Mumbai crime : चारित्र्याच्या संशयातून पत्नीवर हातोडीने हल्ला करून हत्या; आरोपी पती अटकेत

सिंधूचा पायाचा घोटा मागील वर्षी ऑगस्टमध्ये दुखावला. त्यानंतर या दुखापतीमुळे तिला आंतरराष्ट्रीय स्पर्धांपासून दूरच रहावे लागले. बॅडमिंटन कोर्टवर तिने पुनरागमन केले, पण तिच्याकडून अव्वल दर्जाचा खेळ होत नव्हता. अखेरीस माद्रिद ओपनच्या अंतिम फेरीत प्रवेश करण्यात तिला यश मिळाले.

पी.व्ही. सिंधू,
Pune : बारामतीच्या दोन क्रिकेटपटूंची महाराष्ट्र प्रीमियम लीगच्या लिलाव प्रक्रीयेसाठी निवड

मलेशिया मास्टर्स स्पर्धेच्या उपांत्य फेरीत तिने धडक मारली. ती पूर्वपदावर येत आहे असे वाटत असतानाच थायलंड ओपनमध्ये तिला पहिल्याच फेरीत हार सहन करावी लागली. आता या पराभवाला मागे सारून सिंधूला सिंगापूर ओपन स्पर्धेमध्ये आपली चमक दाखवावी लागणार आहे.

पी.व्ही. सिंधू,
Mumbai : मुंबईकरांसाठी राज्य सरकारकडून अतिरिक्त पाणीसाठा; पाणीपट्टी दरवाढीवरून भाजप आक्रमक

सिंधूसमोर महिला एकेरीच्या सलामीच्याच लढतीत जपानच्या अकाने यामागुची हिचे आव्हान असणार आहे. यामागुचीविरुद्ध सिंधूला १४ लढतींमध्ये विजय मिळवता आला आहे. यामागुचीने सिंधूला ९ वेळा हरवले आहे. आकडेवारीवर नजर टाकता सिंधूचे पारडे जड आहे, असे वाटत असले तरी मागील वर्षी ऑगस्ट महिन्यापासून चित्र बदलले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com