Badminton Asia Team Championships : भारतीय महिला बॅडमिंटन संघाने इतिहास रचला, पहिल्यांदाच BATC मध्ये जिंकलं सुवर्ण

Badminton Asia Team Championships Indian Women's Team : पीव्ही सिंधूच्या नेतृत्वाखालील भारतीय महिला संघाने बलाढ्या मलेशियाला दिली मात
Badminton Asia Team Championships Indian Women's Team
Badminton Asia Team Championships Indian Women's Teamesakal

Badminton Asia Team Championships Indian Women Create History : भारतीय महिला बॅडमिंटन संघाने रविवारी मलेशियातील सेलंगोर येथे झालेल्या चुरशीच्या फायनलमध्ये थायलंडचा 3-2 असा पराभव करून बॅडमिंटन आशिया टीम चॅम्पियनशिप स्पर्धेचे विजेतेपद पटकावत इतिहास रचला. बॅडमिंटनच्या इतिहासात भारताने प्रतिष्ठित एशिया टीम चॅम्पियनशिप जिंकण्याची ही पहिलीच वेळ आहे. पीव्ही सिंधू, गायत्री गोपीचंद-ट्रीसा जॉली आणि युवा अनमोल खरब यांनी आपापल्या लढती जिंकल्या.

Badminton Asia Team Championships Indian Women's Team
Ind vs Eng : रन आऊट झाल्यानंतर शुभमन गिल संतापला! कुलदीप यादवच्या 'त्या' चुकीमुळे इतक्या धावांनी हुकले शतक

महिला बॅडमिंटनमधील भारताची सर्वोच्च एकेरी रँकिंग असलेल्या पीव्ही सिंधूने काटेथोंगवर सरळ गेममध्ये विजय मिळवून स्वप्नवत सुरुवात केली होती. भारताची स्टार दुहेरी जोडी तेरेसा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांनी महिला दुहेरीच्या पहिल्या सामन्यात विजय मिळवत भारताला आशिया टीम चॅम्पियनशिप फायनलमध्ये 2-0 अशी महत्त्वाची आघाडी मिळवून दिली.

मात्र, भारताच्या अश्मिता चाहिलाने एकेरीचा दुसरा सामना आणि प्रिया कोन्जेंगबम आणि श्रुती मिश्रा यांनी दुहेरीचा दुसरा सामना देखील गमवाला. त्यामुळे मलेशियाने 2 - 2 अशी बरोबरी साधली. त्यानंतर भारताच्या 17 वर्षाच्या अनमोल खारबने चोइकीवोंगला पराभूत करत भारताला विजेतेपद पटकावून दिलं.

Badminton Asia Team Championships Indian Women's Team
Yashasvi Jaiswal Ind vs Eng : 6,6,6,6,6,6.... यशस्वी जैस्वाल बनला टीम इंडियाचा 'सिक्सर किंग'! तुफानी फलंदाजी करत केला मोठा विक्रम

दुखापतीतून पुनरागमन करून आपली पहिलीच स्पर्धा खेळणाऱ्या पीव्ही सिंधूने अवघ्या 39 मिनिटांत सुपनिंदा काटेथोंगचा 21-12, 21-12 असा पराभव करून भारताला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. गायत्री गोपीचंद आणि जॉली ट्रीसा यांनी जोंगकोलफाम कितिथाराकुल आणि रविंदा प्रजोंगजल यांना तीन गेमच्या चुरशीच्या लढतीत पराभूत केल्याने भारत 2-0 ने पुढे गेला. गायत्री आणि जॉली यांनी आपला उत्साह कायम ठेवला आणि अंतिम गेममध्ये 6-11 ने पिछाडीवरून पुनरागमन करत 5 सामन्यांच्या पहिल्या दुहेरी सामन्यात थाई जोडीचा 21-16, 18-21, 21-16 असा पराभव केला.


(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com