Swiss Open : स्वीस ओपन स्पर्धेत सतरावर्षीय खेळाडूकडून पी. व्ही. सिंधूची हार

पॅरिस ऑलिंपिक जवळ येत असताना पी. व्ही. सिंधूची अपयशाची मालिका कायम राहिली आहे. स्वीस ओपन स्पर्धेत जपानच्या नवोदित खेळाडूकडून तिला पराभव स्वीकारावा लागला
pv sindhu
pv sindhusakal

बासिल (स्वित्झर्लंड) : पॅरिस ऑलिंपिक जवळ येत असताना पी. व्ही. सिंधूची अपयशाची मालिका कायम राहिली आहे. स्वीस ओपन स्पर्धेत जपानच्या नवोदित खेळाडूकडून तिला पराभव स्वीकारावा लागला; तर अपेक्षा उंचावणाऱ्या लक्ष्य सेनचीही उपउपांत्यपूर्व फेरीत हार झाली.

किदांबी श्रीकांत, प्रियांश राजवत आणि किरण जॉर्ज यांनी विजय मिळवत उपांत्यपूर्व फेरी गाठली. काही दिवसांपूर्वी झालेल्या ऑल इंग्लंड स्पर्धेतही दुसऱ्या फेरीत पराभव झालेल्या सिंधूला या स्वीस ओपन स्पर्धेत जपानच्या १७ वर्षीय ज्युनियर विश्वविजेत्या तोमोका मियाझाकी हीने २१-१६, १९-२१, १६-२१ असे हरवले; तर याच ऑल इंग्लंड स्पर्धेत उपांत्य फेरीपर्यंत धडक मारणाऱ्या लक्ष्य सेनची अवघ्या ३८ मिनिटात ली चिया होकडून १७-२१, १५-२१ अशी हार झाली.

भारताचे आशास्थान असलेल्या श्रीकांतने अव्वल मानांकित मलेशियाच्या ली झी जिया याचा २१-१६, २१-१५ असा दोन गेममध्ये पराभव केला; तर राजवतने चीनच्या ली ला झिया याचे आव्हान २१-१४, २१-१३ असे मोडून काढले. किरण जॉर्ज सुरुवातीला अडखळला होता; परंतु त्यानंतर त्याने शानदार खेळ करत अलेक्स लानियरवर १८-२१, २२-२०, २१-१८ अशी मात केली. हा सामना ७१ मिनिटे चालला.

श्रीकांतचा पुढच्या फेरीत सामना ली चिया हाओविरुद्ध; तर राजवतची लढत तैपेच्या चोऊ तिएन चेन याच्याविरुद्ध होईल. जपानच्या मियाझाकी १७ वर्षांची असली, तरी तिने २०२२ मधील ज्युनियर विश्वकरंडक स्पर्धेत विजेतेपद मिळवून आपली चमक दाखवलेली आहे. या स्वीस ओपन स्पर्धेत खेळण्या अगोदर तिने फ्रान्समध्ये झालेल्या ऑरलेन्स मास्टर्स स्पर्धेत विजेतेपद मिळवलेले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com