
PV Sindhu Wedding Photo: भारताची स्टार बॅडमिंटनस्टार पीव्ही सिंधू हिच्या वैयक्तित आयुष्यात एक आनंदाची घटना घडली आहे. पीव्ही सिंधू हिने उद्योगपती वेंकट दत्त साई यांच्यासोबत लग्न केले आहे. पीव्ही सिंधू आणि वेंकट यांचा रविवारी (२२ डिसेंबर) उदयपूरमध्ये विवाहसोहळा पार पडला.
त्यांच्या विवाहसोहळ्यासाठी त्यांचे कुटुंबिय आणि मित्रपरिवार उपस्थित होते. तसेच त्यांनी अनेक मोठ्या मान्यवरांनाही लग्नाचे आमंत्रण दिले होते. आता त्यांचा लग्नातील पहिला फोटो सर्वांसमोर आला आहे.