esakal | Tokyo Olympics 2021: पाच ऑलिम्पिक कर्मचारी कोरोनाबाधित
sakal

बोलून बातमी शोधा

tokyo olympics

Tokyo Olympics 2021: पाच ऑलिम्पिक कर्मचारी कोरोनाबाधित

sakal_logo
By
विराज भागवत

टोकियो: ब्राझील संघाचा मुक्काम असलेल्या हॉटेलमधील आठ कर्मचारी बाधित आढळल्यानंतर आता ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेत विविध ठिकाणी काम करणारे कंत्राटदार बाधित आढळले आहेत. त्यात स्टेडियम निगराणीची जबाबदारी असलेले कर्मचारी बाधित आढळल्याने चिंता वाढली आहे. ऑलिंपिक स्पर्धेसाठी कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या लक्षात घेतल्यास बाधितांची संख्या खूपच कमी असल्याचे सांगितले जात आहे, पण स्पर्धेशी संबंधित बाधित वाढत असल्याने हा धोक्याचा इशारा समजला जात आहे. (Tokyo Olympics 2021 total 5 people from Tokyo Olympics test positive for Covid 19)

हेही वाचा: ऋषभ पंत कोरोना पॉझिटिव्ह; मित्राच्या घरी झाला होम-क्वारंटाईन

ऑलिंपिकसाठी काम करीत असलेले चार कंत्राटदार, एक कर्मचारी, तसेच एक खेळाडू बाधित आढळल्याचे संयोजकांनी सांगितले. याबाबत अतिरिक्त माहिती देण्यास संयोजकांनी नकार दिला. दरम्यान, ब्राझील संघ मुक्कामास येण्यापूर्वी झालेल्या चाचणीत हॉटेलमधील आठ कर्मचारी बाधित आढळले होते, असे आता सांगण्यात येत आहे.

हेही वाचा: Video: रसल vs स्टार्क, 6 चेंडूत 11 धावा... पाहा पुढे काय घडलं...

उद्घाटन सोहळ्यास एक हजारांपेक्षा कमी VIP?

उद्घाटन सोहळ्याच्या वेळी एक हजारपेक्षा कमी व्हीआयपी स्टेडियममध्ये उपस्थित असतील असे सांगण्यात येत आहे. सुरुवातीस ६८ हजार क्षमतेच्या स्टेडियममध्ये दहा हजारांना प्रवेश देण्याचा विचार होता. स्पर्धा पुरस्कर्त्यांच्या पाहुण्यांना स्टेडियममध्ये प्रवेश नाकारण्याचे ठरले असल्याचे समजते. याचबरोबर विविध स्टेडियम क्षमतेच्या फारतर एकूण ३.५ टक्केच लोकांना प्रवेश असेल, असेही सांगितले जात आहे.

loading image