esakal | Tokyo Olympics: ऑलिंपिकमुळे कोरोनाचा शून्य प्रसार; IOCचा दावा
sakal

बोलून बातमी शोधा

japan Olympic

Tokyo Olympics: ऑलिंपिकमुळे कोरोनाचा शून्य प्रसार; IOCचा दावा

sakal_logo
By
विराज भागवत

टोकियो, ता. १५ : ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा संयोजनामुळे जपानमध्ये कोरोनाचा प्रसार वाढेल, अशी भीती व्यक्त होत आहे, पण ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेमुळे जपानमध्ये कोरोनाचा प्रसार होण्याची शक्यता शून्य असल्याचे स्पष्ट प्रतिपादन आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीचे अध्यक्ष थॉमस बाक यांनी व्यक्त केले. जपानमधील कोरोना रुग्ण सातत्याने वाढत असतानाच बाक यांनी हे मत व्यक्त केले.

हेही वाचा: Tokyo Olympics 2021: पाच ऑलिम्पिक कर्मचारी कोरोनाबाधित

ऑलिंपिकसाठी क्रीडापटू तसेच पदाधिकारी टोकियोत येण्यास सुरुवात झाली आहे. ऑलिम्पिकमुळे जपानमध्ये आलेल्या ८ हजार जणांची आत्तापर्यंत चाचणी करण्यात आली. त्यातील तिथे बाधित आढळले आहेत. या बाधितांचे विलगीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे क्रीडानगरी कोरोनाचा प्रसार होण्याची शक्यता शून्य आहे, असे बाक म्हणाले. टोकियोच्या प्रांतप्रमुख युरिको कोईके, संयोजन समितीचे अध्यक्ष सेईको हाशीमोतो यांच्याशी चर्चेच्यावेळी बाक यांनी ही टिप्पणी केली.

Tokyo Olympics  Indian players

Tokyo Olympics Indian players

हेही वाचा: Video: रसल vs स्टार्क, 6 चेंडूत 11 धावा... पाहा पुढे काय घडलं...

ऑलिंपिक स्पर्धा सुरु होण्यापूर्वी एक आठवडा टोकियोत १ हजार ३०८ बाधित आढळले. त्यामुळे ऑलिंपिक स्पर्धा संयोजनाचा विरोध वाढत आहे. स्पर्धा विरोधात स्वाक्षरी मोहीम सुरू आहे. त्यावर साडेचार लाख जणांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत.

हेही वाचा: ऋषभ पंत कोरोना पॉझिटिव्ह; मित्राच्या घरी झाला होम-क्वारंटाईन

बायो-बबल पद्धतीचा वापर

ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा जैवसुरक्षित वातावरणात होणार हे सांगितले जात आहे. पण हे कितपत सुरक्षित आहे, अशी विचारणा होत आहे. केनियाच्या महिला रग्बी संघातील खेळाडू कोरोना चाचणीत निगेटिव्ह आढळले. मात्र या खेळाडू आलेल्या विमानातील एक प्रवासी बाधित आढळला. या खेळाडू त्या व्यक्तीच्या संपर्कात होत्या. मात्र त्यानंतरही संघाचा मुक्काम क्रीडानगरीतच आहे, याकडे लक्ष वेधले जात आहे.

loading image