IND vs NZ: हुश्श.. अखेर अश्विनने फोडली सलामीवीरांची जोडी

किपर केएस भरतने घेतला अप्रतिम झेल, पाहा Video | Will Young Wicket
Ashwin-Wicket
Ashwin-Wicket
Summary

किपर केएस भरतने घेतला अप्रतिम झेल, पाहा Video

IND vs NZ 1st Test Day 3 Live Updates : भारतीय संघाने दमदार फलंदाजी केल्यानंतर न्यूझीलंडच्या संघानेही यजमानांना जोरदार प्रत्युत्तर दिलं. टीम इंडियाने श्रेयस अय्यरच्या शतकाच्या जोरावर पहिल्या डावात ३४५ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात न्यूझीलंडच्या फलंदाजांनी दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत १२९ धावांची भक्कम सलामी दिली. त्यानंतर तिसऱ्या दिवशीही त्यांना दमदार सुरूवात करून दिली. अखेर डावाच्या ६६व्या षटकांत रविचंद्रन अश्विनने ही जोडी फोडली.

Ashwin-Wicket
IND vs NZ: झकास बॅटिंग करूनही श्रेयसला लागत नव्हती झोप, कारण...

दुसऱ्या दिवसअखेर विल यंग नाबाद ७५ तर टॉम लॅथम नाबाद ५० धावांवर खेळत होता. आज सकाळी पहिल्या काही वेळात त्या दोघांनी झटपट धावा करायला सुरूवात केली होती. पण अखेर अश्विनने २१४ चेंडूत ८९ धावा केल्या. १५ चौकारांसह त्याने आपली खेळी सजवली. पण विल यंगचे शतक हुकले. अश्विनच्या गोलंदाजीवर केएस भरतने उत्तम झेल घेतला.

पाहा VIDEO:

Ashwin-Wicket
IND vs SA: दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी अशी असू शकते टीम इंडिया

दरम्यान, भारताने पहिल्या डावात ३४५ धावा केल्या. मयंक अग्रवाल (१३), चेतेश्वर पुजारा (२६), अजिंक्य रहाणे (३५), वृद्धिमान साहा (१), रविचंद्रन अश्विन (३८), अक्षर पटेल (३) यांना फलंदाजीत फारशी चमक दाखवता आली नाही. पण, श्रेयस अय्यरने दमदार शतक (१०५) लगावले. त्याला शुबमन गिल (५२) आणि रविंद्र जाडेजा (५०) यांनी चांगली साथ दिली. त्यामुळे भारताला ३४५ धावांपर्यंत मजल मारता आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com