प्रज्ञानानंदाची काळी प्यादी जोमात; जगज्जेता कार्लसेन कोमात!

R Praggnanandhaa Defeat world no 1 chess Player Magnus Carlsen in Airthings Masters
R Praggnanandhaa Defeat world no 1 chess Player Magnus Carlsen in Airthings Masters esakal

चेन्नई: भारताचा तरूण बुद्धीबळपटू आर. प्रज्ञानानंदाने (R Praggnanandhaa) जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या मॅग्नस कार्लसेनला (Magnus Carlsen) पराभवाचा धक्का दिला. एअरथिंग्ज मास्टर्स (Airthings Masters) ऑनलाईन रॅपिड बुद्धीबळ (Chess) स्पर्धेच्या 8 व्या फेरीत परागनंदाने ही कामगिरी केली. परागनंदाने आज काळ्या प्याद्यानिशी 39 चालीत जगज्जेत्या कार्लसेनला सलग तिसऱ्या विजयापासून रोखले.

R Praggnanandhaa Defeat world no 1 chess Player Magnus Carlsen in Airthings Masters
राज्‍य बुद्धिबळ संघात नाशिकचा कैवल्य नागरे

भारताचा ग्रँडमास्टर प्रज्ञानानंदा आठव्या फेरीअखेर आठ गुणांसह 12 व्या स्थानावर पोहचला आहे. त्याने पहिल्या राऊंडमध्ये मॉडरेट रननंतर कार्लसेनवर दमदार विजय मिळवला. याचबरोबर प्रज्ञानानंदाने लेव्ह अॅरोनियनवर देखील विजय मिळवला होता. तसेच दोन सामने ड्रॉ देखील केले होते. त्याने अनिश गिरी आणि क्युआंग लिएम याच्याविरूद्धचा सामना ड्रॉ केला होता. तर एरिक हानसेन, डिंग लिरेन, जॅन क्रयझस्टॉफ दुदा आणि मॅमेद्यारोव्ह यांच्याविरूद्धचा सामना गमावला होता.

R Praggnanandhaa Defeat world no 1 chess Player Magnus Carlsen in Airthings Masters
साहाने चॅट उघड करताच गांगुलीचा मोठा भाऊ म्हणाला 'चूक' केलीस

रशियाच्या इआन नेपोमनिचच्चीने काही महिन्यापूर्वीच नॉर्वेच्या कार्लसेनकडून वर्ल्ड चेस चॅम्पियनशिपचा सामना गमावला होता. मात्र आता एअरथिंग्ज मास्टर्समध्ये (Airthings Masters) 19 गुणांसह तो अव्वल स्थानावर आहे. त्यानंतर डिंग लिरेन आणि हानसेन प्रत्येकी 15 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहेत.

एअरथिंग्ज मास्टर्समध्ये 16 खेळाडू ऑनलाईन रॅपिड स्पर्धेत सहभागी झाले आहेत. पहिल्या फेरीत खेळाडूंना एका विजयासाठी 3 गुण तर ड्रॉसाठी 1 गुण मिळतो. पहिल्या फेरीतील अजून सात फेऱ्या शिल्लक आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com