IND VS SA : रबाडा, नॉर्कियाचा भारताविरुद्ध तोफखाना

कसोटी मालिकेसाठी द. आफ्रिकेचा संघ जाहीर
IND VS SA : रबाडा, नॉर्कियाचा भारताविरुद्ध तोफखाना

जोहान्सबर्ग : भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये २६ डिसेंबरपासून तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होणार असून या महत्त्वाच्या मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकन क्रिकेट संघाची घोषणा मंगळवारी करण्यात आली. डीन एल्गारकडे या संघाचे नेतृत्व सोपविण्यात आले असून कागिसो रबाडा आणि नॉर्किया यांचा तोफखाना सज्ज करण्यात आला आहे. या संघात वेगवान गोलंदाज सिसांडा मगाला व यष्टिरक्षक फलंदाज रायन रिकलटन या दोन नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे.

भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये जागतिक कसोटी चॅम्पियनशिपअंतर्गत तीन कसोटी सामन्यांची मालिका आयोजित करण्यात येणार आहे. नेदरलॅंविरुद्धच्या वन डे मालिकेत ॲनरिक नॉर्किया व कागिसो रबाडा यांना विश्रांती देण्यात आली होती. परंतु, आता दोन्हीही अनुभवी वेगवान गोलंदाजांचे या संघात पुनरागमन झाले आहे.

IND VS SA : रबाडा, नॉर्कियाचा भारताविरुद्ध तोफखाना
Sports News : हार्दिक पंड्याच्या दुखापतीचे रहस्य कायम

ड्वेन ओलीवीएर याचे २०१९ नंतर दक्षिण आफ्रिकन कसोटी संघात कमबॅक झाले आहे. प्रीनीलन सुब्रएन व ग्लेनटन स्टरमॅन यांच्यासाठीही दक्षिण आफ्रिकन संघाचे दरवाजे उघडे करण्यात आले आहेत. दरम्यान, कोरोनाच्या नव्या वेरिएंटमुळे दोन देशांमध्ये १७ डिसेंबरपासून सुरू होणारी ही मालिका आता २६ डिसेंबरपासून खेळविण्यात येणार आहे.

संघ : डीन एल्गार (कर्णधार), तेम्बा बवुमा, डी कॉक (यष्टिरक्षक), कागिसो रबाडा, सॅरेल इर्वी, ब्यूरॅन हेन्ड्रीक्स, जॉर्ज लिंडे, केशव महाराज, एनगिडी, मार्करम, वियान मुल्डर, ॲनरिक नॉर्किया, किगन पीटरसन, रॅसी वॅन डर ड्युसेन, काईल वीरीएन, मार्को यानसेन, ग्लेनटन स्टरमॅन, प्रीनीलन सुब्रएन, सिसांडा मगाला, रायन रिकलटन, ड्वेन ओलीवीएर.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com