
यात माझ्या सहकाऱ्याचा काय दोष; नदाल - जोकोविचची विंम्बल्डनवर टीका
राफेल नदाल (Rafael Nadal) आणि नोव्हक जोकोविच (Novak Djokovic) या दोन दिग्गज टेनिसपटूंनी विम्बल्डनवर (Wimbledon) सडकून टीका केली. त्यांनी रशियन आणि बेलारूसच्या टेनिसपटूंवर बंदी घालण्याच्या विम्बल्डनच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली. विम्बल्डनने रशियाने (Russia) युक्रेवर (Ukraine) आक्रमण केल्याचा निषेध म्हणून रशियन आणि त्यांना साथ देणाऱ्या बेलारूसच्या टेनिसपटूंवर बंदी घातली आहे.
हेही वाचा: हैदराबादचा 'वेगवान' कोच डेल स्टेनने घेतली धोनीची स्वाक्षरी
याबाबर राफेल नदाल म्हणाला की, 'मला असे वाटते की हा निर्णय खूप दुर्दैवी आणि अन्यायकारक आहे. माझे रशियन टेनिसपटू सहकारी त्यांचा या युद्धाशी काय संबंध आहे. त्यात त्यांची काय चूक आहे. मला त्यांच्याविषयी वाईट वाटते.' राफेल नदालने 21 ग्रँडस्लॅम जिंकल्या आहेत. नदाल पुढे म्हणाले की, 'विम्बल्डनने त्यांचा निर्णय घेतला. त्यांना सरकारने कोणतीही सक्ती केली नव्हती. आता पुढच्या आठवड्यात काय होते ते पाहू, खेळाडू याबाबत काही निर्णय घेण्याची शक्यता आहे.'
हेही वाचा: कर्णधाराला प्रत्येकवेळी 'चमच्यानं भरवणं' शक्य होत नाही : धोनी
दरम्यान, कोरोनाच्या नियमांचा भंग केल्यामुळे ऑस्ट्रेलियन ओपनमधून माघारी धाडण्यात आलेल्या नोव्हाक जोकेविचने देखील विम्बल्डनवर टीका केली. तो म्हणाला की, 'मी गेल्या वर्षी अशाच प्रकारच्या परिस्थितीतून मी देखील गेलो आहे. तुम्ही खेळू शकणार नाही हे माहिती झाल्यावर तुमची खूप निराशा होते.'
हेही वाचा: रेल्वेत 'क' श्रेणी नोकरी करणाऱ्या इंजिनियरसाठी कसं उघडलं IPLचं दार?
युएस ओपन चॅम्पियनशिप जिंकलेला डॅनिल मेद्वेदेव (Daniil Medvedev), अँड्रे रूब्लेव्ह आणि फ्रेंच ओपनची उपविजेती अॅनास्टासिया पाव्हल्युचेनकोव्हा या रशियन खेळाडूंना विम्बल्डन खेळता येणार नाही. याचबरोबर व्हिक्टोरिया अझारेन्का या बेलारूसच्या टेनिसपटूला देखील विम्बल्डनमध्ये खेळता येणार नाही. रशियन फौजांना बेलारूस मदत करत आहे. त्यामुळे त्यांच्यावही बंदी घालण्यात आली आहे.
Web Title: Rafael Nadal And Novak Djokovic Criticized Wimbledon Decision Against Russia Belarus Tennis Players
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..