Rafael Nadal : राफेल नदालची गुड न्युज झाला बाबा! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rafael Nadal

Rafael Nadal : राफेल नदालची गुड न्युज झाला बाबा!

Rafael Nadal News : टेनिस दिग्गज आणि 22 ग्रँडस्लॅम विजेतेपदांचा बादशाह राफेल नदाल याच्या घरून मोठी बातमी आली आहे. तो पहिल्यांदाच वडील झाला आहे. नदालची पत्नी मारिया पेरेलो हिने शनिवारी पहिल्या मुलाला जन्म दिला. नदाल आणि मारिया यांनी तीन वर्षांपूर्वी लग्नगाठ बांधली होती. ही बातमी स्पॅनिश फुटबॉल क्लब रिअल माद्रिदने आपल्या सोशल मीडिया हँडलवरून शेअर केली आहे.

हेही वाचा: Rishabh Pant-Urvashi Rautela : तू जिथे तिथे मी... पंतला फॉलो करत उर्वशी थेट ऑस्ट्रेलियात...

नदालने अद्याप कोणतीही पोस्ट शेअर केली नाही, परंतु फुटबॉल क्लब रियल माद्रिदने त्याच्या चाहत्यांसाठी ही आनंदाची बातमी दिली आहे. रिअल माद्रिदने नदालला टॅग करत एक ट्विट केले आहे. क्लबने लिहिले, आमचे प्रिय सदस्य राफेल नदाल आणि मारिया पेरेलो यांना त्यांच्या पहिल्या मुलाच्या जन्माबद्दल अभिनंदन. या आनंदाच्या क्षणात आम्ही तुमच्यासोबत आहोत. हार्दिक शुभेच्छा.

हेही वाचा: डेव्हिड मिलरवर दुःखाचा डोंगर, कॅन्सरने चिमुकलीचे निधन, सामन्यापूर्वी शेअर केला भावूक Video

अनुभवी टेनिसपटू राफेल नदालने 2019 मध्ये त्याची गर्लफ्रेंड मारियाशी लग्न केले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ते 2005 पासून एकमेकांना डेट करत होते. नदालने 14 वर्षांच्या नात्याचे लग्नात रूपांतर केले. दोघांचे लग्न स्पेनमधील एका प्रसिद्ध रिसॉर्टमध्ये झाले. नदालचे लग्न खूप गाजले होते. दोन आठवड्यांपूर्वी नदालने लेव्हर कपमध्ये दिग्गज रॉजर फेडररसोबत हातमिळवणी केली होती. हा फेडररचा निरोपाचा सामना होता. त्यानंतर स्विस स्टारने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला अलविदा केला. फेडररच्या फेअरवेल मॅचमध्ये नदालही भावूक झाला आणि त्यानंतर अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

टॅग्स :Rafael Nadal