रॅफेल नदालने पटकाविले 16 वे ग्रँड स्लॅम विजेतेपद

वृत्तसंस्था
सोमवार, 11 सप्टेंबर 2017

यूएस ओपनच्या निर्णायक लढतीत नदालसमोरदक्षिण आफ्रिकेच्या केव्हिन अँडरसनचे आव्हान होते. नदालने अँडसरनचे आव्हान सरळ तीन सेटमध्ये मोडून काढले. नदालने यापूर्वी 2010 आणि 2013 मध्ये यूएस ओपनचे विजेतेपद पटकाविले होते.

न्यूयॉर्क : स्पेनच्या जिगरबाज रॅफेल नदालने यूएस ओपनचे विजेतेपद पटकावत कारकिर्दीत 16 वे गँड स्लॅम विजेतेपद मिळविले. नदालने अंतिम सामन्यात केव्हिन अँडरसनचा 6-3, 6-3, 6-4 असा पराभव केला. 

यूएस ओपनच्या निर्णायक लढतीत नदालसमोरदक्षिण आफ्रिकेच्या केव्हिन अँडरसनचे आव्हान होते. नदालने अँडसरनचे आव्हान सरळ तीन सेटमध्ये मोडून काढले. नदालने यापूर्वी 2010 आणि 2013 मध्ये यूएस ओपनचे विजेतेपद पटकाविले होते. त्याने यावर्षी जूनमध्ये फ्रेंच ओपनचे विजेतेपद मिळविले असून, त्याचे या वर्षातील दुसरे विजेतेपद आहे. तर, कारकिर्दीतील 16 वे ग्रँड स्लॅम विजेतेपद आहे.

नदाल या वर्षातील ऑस्ट्रेलियन या ग्रँड स्लॅम स्पर्धेमध्ये स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडररकडून पराभव स्वीकारावा लागला होता. फेडररने आतापर्यंत 19 ग्रँड स्लॅम विजेतेपद मिळविलेली आहेत. या वर्षातील नदालने मिळविलेले हे पाचवे विजेतेपद आहे. नदालने आतापर्यंत बक्षिसाच्या माध्यमातून मिळविलेली रक्कम ही 90 मिलियन अमेरिकन डॉलर इतकी झाली आहे. 

Web Title: Rafael Nadal races to third US Open, 16th Grand Slam title