संशोधन करून 'डॉक्टरेट' मिळवणार- द्रविड

वृत्तसंस्था
गुरुवार, 26 जानेवारी 2017

द्रविडने यापूर्वी 2014 मध्ये गुलबर्गा विश्वविद्यापीठाच्या दीक्षांत सोहळ्यात सहभाग घेतला नव्हता. त्यावेळी त्याच्यासह 12 जणांना मानद डॉक्टरेट पदवी देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. द्रविड सध्या 19 वर्षांखालील भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक आहे.

बंगळूर - बंगळूर विश्वविद्यापीठाकडून जाहीर करण्यात आलेली मानद डॉक्टरेट पदवी घेण्यास नकार देत, खेळाच्या क्षेत्रात संशोधन करुन डॉक्टरेट पदवी मिळविणार असल्याचे भारताचा माजी क्रिकेटपटू राहूल द्रविड याने म्हटले आहे.

द वॉल अशी ओळख असलेल्या राहुल द्रविडने कायमच आपल्या खेळाने सर्वांना प्रभावित केले होते. आता त्याच्या या निश्चयामुळे द्रविडचे कौतुक करण्यात येत आहे. बंगळूर विश्वविद्यापीठाकडून ‘मानद डॉक्टरेट’ स्वीकारण्यास नकार दिला. डॉक्टरेट मिळवण्यासाठी आवश्यक अशी कोणतीही भरीव कामगिरी केलेली नसताना, अशी डॉक्टरेट स्वीकारण्याऐवजी आपण खेळाच्या क्षेत्रात संशोधन करुन डॉक्टरेट मिळवण्याचा प्रयत्न करु अशी प्रतिक्रिया द्रविडने दिली आहे.

बंगळुरु विश्वविद्यापीठाने 27 जानेवारीला होणाऱ्या 52 व्या दीक्षांत समारंभात द्रविडला ‘डॉक्टरेट’ पदवी बहाल करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, द्रविडने नकार दिला. कुलपती बी. थिमे गौडा यांनी याबाबत सांगितले की, डॉक्टरेट पदवी बहाल करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल राहुल द्रविड यांनी बंगळुरु विश्वविद्यापीठाचे आभार मानले आहेत. मात्र, पदवी स्वीकारण्यास नकार दिला आहे.

द्रविडने यापूर्वी 2014 मध्ये गुलबर्गा विश्वविद्यापीठाच्या दीक्षांत सोहळ्यात सहभाग घेतला नव्हता. त्यावेळी त्याच्यासह 12 जणांना मानद डॉक्टरेट पदवी देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. द्रविड सध्या 19 वर्षांखालील भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक आहे.

Web Title: rahul dravid declines bangalore university honorary doctorate