वर्कलोडवर लक्ष ठेवावेच लागेल : राहुल द्रविड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वर्कलोडवर लक्ष ठेवावेच लागेल : राहुल द्रविड
सततच्या सामन्यांचा ताण आणि त्यातून मार्ग काढणे आता क्रिकेटमध्ये सर्वात महत्त्वाचे आहे. #RahulDravid #SakalNews

वर्कलोडवर लक्ष ठेवावेच लागेल : राहुल द्रविड

पुणे : सततच्या सामन्यांचा ताण आणि त्यातून मार्ग काढणे आता क्रिकेटमध्ये सर्वात महत्त्वाचे आहे. फुटबॉलमध्येही तसेच घडत आहे. शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्ती सर्वाधिक महत्त्वाची असताना हा वर्कलोडचा समतोल साधणे अनिवार्य आहे, असे मत टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्वीकारताना राहुल द्रविड यांनी आपल्या पहिल्याच पत्रकार परिषदेत सांगितले.

खेळाडू काही मशीन नाही. भविष्यातील सर्व आव्हानांसाठी आपले खेळाडू ताजेतवाने आणि तंदुरुस्त राहणे आवश्यक आहे आणि प्रत्येक मालिका खेळल्यानंतर आम्ही सर्वांचे अवलोकन करणार आहोत, असे द्रविड म्हणाले.

कोणत्या एका फॉरमॅटला प्राधान्य देऊन चालणार नाही; सगळेच प्रकार महत्त्वाचे आहेत. दोन वर्षांत दोन आयसीसी वर्ल्डकप स्पर्धा आणि कसोटी अजिंक्यपद स्पर्धा आहे. त्याची तयारी रोज नवीन शिकून सुधारणा करत राहून करायची आहे, असे राहुल द्रविड यांनी सांगितले.

अष्टपैलूच महत्त्वाचा नाही

संघाला अष्टपैलू खेळाडू हवा आहे, हे मान्य करताना रोहितने फक्त त्याच्याकडे लक्ष देऊन चालणार नाही. खेळाच्या सर्व प्रांताकडे आपण लक्ष देणार आहोत. तसेच स्थानिक स्पर्धांकडे लक्ष द्यायला हवे. म्हणजे मग चांगल्या खेळाडूंचा शोध घेता येईल. त्यांना मुख्य प्रवाहात आणता येईल, असा मुद्दा कर्णधार रोहितने मुद्दा मांडला.

loading image
go to top