Rahul Dravid Press Conference | संघ नक्की कसा असेल? कोच राहुल द्रविडने दिलं स्पष्ट उत्तर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rahul Dravid

येत्या काळात वन-डे, T20 आणि कसोटी वर्ल्ड कप

संघ नक्की कसा असेल? कोच राहुल द्रविडने दिलं स्पष्ट उत्तर

Rahul Dravid Press Conference : भारतीय संघ आजपासून न्यूझीलंडविरूद्ध टी२० मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी दोन्ही संघांनी अनेक अनुभवी खेळाडूंना विश्रांती दिली आहे. आधी आयपीएल आणि त्यानंतर टी२० विश्वचषक स्पर्धा यामुळे खेळाडूंवर ताण पडला असून विराट कोहलीपासून ते केन विल्यमसनपर्यंत बरेच प्रमुख खेळाडू संघाबाहेर बसले आहेत. टी२० वर्ल्डकपनंतर विराट आणि रवी शास्त्री हे आपापल्या पदावरून पायउतार झाले. त्यानंतर राहुल द्रविडने मुख्य प्रशिक्षक पदाची सूत्रे हाती घेत काल टी२० संघाचा नवा कर्णधार रोहित शर्मा याच्यासोबत संयुक्त पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी काही महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे दिली.

हेही वाचा: IND vs NZ : "आता विराट संघात काय करणार?"; रोहितने दिलं उत्तर

भारतीय संघाचा टी२० संघाचा कर्णधार रोहित शर्मा असणार आहे. तर वन डे आणि कसोटी संघाचे नेतृत्व विराट कोहलीकडे असणार आहे. त्यामुळे तीन वेगवेगळ्या फॉरमॅट खेळताना संघाची नक्की कशाप्रकारची बांधणी केली जाईल? असा सवाल राहुल द्रविडला विचारण्यात आला. त्यावर द्रविडने स्पष्ट शब्दात उत्तर दिलं.

राहुल द्रविड म्हणाला की कोणत्याही क्रिकेट फॉरमॅटला दुसऱ्या फॉरमॅटपेक्षा जास्त महत्त्व दिलं जाणार नाही. टी२०, कसोटी आणि वन डे तिन्ही प्रकारच्या क्रिकेट संघांना समान महत्त्व असेल. "मी कोणत्याही एका क्रिकेट फॉरमॅटला प्राधान्य देणार नाही. माझ्यासाठी सर्व फॉरमॅट सारखेच असतील. तिन्ही फॉरमॅट हे तितकेच कठीण आहेत. एखाद्या फॉरमॅटकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. कारण आगामी काळात तिन्ही फॉरमॅटचे वर्ल्ड कप रंगणार आहेत. या तिन्ही फॉरमॅटसाठी आपल्याला संघाची बांधणी करायची आहेत", असे स्पष्टीकरण द्रविडने दिले.

हेही वाचा: "खेळाडू म्हणजे मशिन नाही"; कर्णधार होताच रोहितचं रोखठोक मत

"आगामी काळात येणाऱ्या या ICC च्या मोठ्या स्पर्धांसाठी तयारी कशी करायची याकडे साऱ्यांनीच लक्ष पुरवणं गरजेचं आहे. त्यामुळे सातत्याने आपल्या स्वत:च्या कामगिरीत सुधारणा करत राहणे हीच या स्पर्धांसाठी आपली तयारी असणार आहे. जर हा पॅटर्न सतत सुरू ठेवला तर नक्कीच प्रत्येक स्पर्धेत आपले संघ आणि संपूर्ण संघ दमदार कामगिरी करून दाखवेल", असं द्रविडने नमूद केलं.

loading image
go to top