मनात घर केलेल्या द्रविडच्या थेट घरात घुसली होती तरुणी

त्याकाळात अनेक तरुणी लव्ह लेटर्स पाठवत. एकदा तर एक जबऱ्या फॅन असणारी तरुणी राहुल द्रविडला भेटण्यासाठी त्याच्या घरी पोहचली होती.
Rahul Dravid
Rahul DravidFile Photo

भारतीय संघाचा माजी कर्णधार राहुल द्रविड आगामी श्रीलंका दौऱ्यावर टीम इंडियाला मार्गदर्शनाचे धडे देताना दिसणार आहे. विराट कोहली आणि रवि शास्त्री यांच्यासह भारताचा कसोटी संघ इंग्लंड दौऱ्यावर आहे. यादरम्यान शिखर धवनच्या नेतृत्वाखाली श्रीलंका दौऱ्यावर जाणाऱ्या भारतीय मर्यादित संघाच्या प्रशिक्षक पदाची धूरा ही राहुल द्रविडकडे सोपवण्यात आलीये.

राहुल द्रविड (Rahul Dravid) च्या फॅन फॉलोवर्समध्ये महिला वर्गही मोठ्या प्रमाणात होता. अनेक तरुणी त्याला भेटण्यासाठी वेड्या व्हायच्या. खुद्द राहुल द्रविडने एका मुलाखतीमध्ये यासंदर्भातील खास किस्सा शेअर केलाय. त्याकाळात अनेक तरुणी लव्ह लेटर्स पाठवत. एकदा तर एक जबऱ्या फॅन असणारी तरुणी राहुल द्रविडला भेटण्यासाठी त्याच्या घरी पोहचली होती. घरात घुसल्यानंतर ती बाहेर पडायला तयार नव्हती. खुद्द राहुल द्रविडने एका कार्यक्रमामध्ये हा किस्सा सांगितला.

Rahul Dravid
WTC : 15 पैकी 6 जण टीम इंडियाच्या प्लेइंग XI मध्ये फिक्स!

विक्रम साठे याच्या 'वट द डक' या कार्यक्रमात राहुल द्रविड सहभागी झाला होता. यावेळी द्रविड म्हणाला की, प्रत्येक चाहत्याला मी प्रत्यक्षात भेटावे. त्याला खास वेळ द्यावा, असे माझ्या आई-वडिलांना वाटायचे. एकदा मी मोठ्या दौऱ्यावरु घरी परतलो होतो. सकाळपासून घरी झोपलो होतो. सायंकाळी जेव्हा मी झोपून उठलो त्यावेळी आईने एक चाहती हैदराबादवरुन खास मला भेटण्यासाठी आल्याचे सांगितले. मी तिला भेटलो. सही देऊन तिच्यासोबत फोटोही काढला. पण त्यानंतर तिने घरातून बाहेर पडायला साफ नकार दिला. तुझ्यासाठी सर्व काही सोडून आल्याचे सांगत तिने माझ्यासोबत राहण्याचा अट्टाहास धरला होता. तिचा हा हट्ट पाहून माझ्या आई-वडिलांना त्यांची चूक कळली, असेही राहुल द्रविडने सांगितले. कोणत्याही चाहत्याला घरात घेऊ नये, याची द्रविडच्या आई-वडिलांना याप्रकरणानंतर जाणीव झाली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com