Rahul Dravid : वरिष्ठांना नारळ अन् पांड्या T20 संघाचा कर्णधार; द्रविड काय म्हणतोय? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rahul Dravid Statement About Captain Rohit Sharma Future

Rahul Dravid : वरिष्ठांना नारळ अन् पांड्या T20 संघाचा कर्णधार; द्रविड काय म्हणतोय?

Rahul Dravid Statement About Captain Rohit Sharma Future : भारताचे टी 20 वर्ल्डकपमधील आव्हान संपुष्टात आल्यानंतर संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविडला कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या भविष्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. ऑस्ट्रेलियातील टी 20 वर्ल्डकपनंतर भारतीय टी 20 संघाच्या नेतृत्वात बदल होण्याची शक्यता आधीपासूनच वर्तवण्यात येत होती. रोहितचा उत्तराधिकारी म्हणून हार्दिक पांड्याचे नाव सध्या आघाडीवर आहे. याबाबत प्रशिक्षक राहुल द्रविडने इंग्लंडविरूद्धचा सामना हरल्यानंतर वक्तव्य केले आहे.

हेही वाचा: IND vs ENG : कुचकामी फिरकी अन् छोट्या सामन्यातील मोठे स्टार; भारताच्या पराभवाची ही आहेत 5 कारणे

राहुल द्रविड इंग्लंडविरूद्धचा सेमी फायलन सामना झाल्यानंतरच्या पत्रकार परिषदेत म्हणाला की, 'संघातील वरिष्ठ खेळाडूंच्या भविष्याबाबत आता बोलणे घाईचे होईल. आमच्याकडे पुढच्या टी 20 वर्ल्डकपपूर्वी खूप वेळ आहे.' दरम्यान, इंग्लंडविरूद्धच्या सामन्यात खराब सुरूवातीनंतर विराट कोहलीच्या 50 आणि हार्दिक पांड्याच्या 63 धावांचा झुंजार खेळीमुळे भारताने 20 षटकात 6 बाद 168 धावा केल्या. मात्र हे आव्हान इंग्लंडचे सलामीवीर अॅलेक्स हेल्स (87) आणि जॉस बटलर (80) यांनी नाबाद पार केले.

हेही वाचा: Rohit Sharma : 'IPL मध्ये हेच खेळाडू दबावात चांगले खेळतात मात्र...' पाणावले रोहितचे डोळे

भारताचा संघ 18 नोव्हेंबरपासून न्यूझीलंड दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यावर आताच्या टी 20 वर्ल्डकप खेळलेल्या संघातील बऱ्याच खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. या दौऱ्यावर भारत तीन टी 20 आणि तीन वनडे सामन्यांची मालिका खेळणार आहे. वनडे मालिकेसाठी शिखर धवन संघाचे नेतृत्व करणार आहे. तर हार्दिक पांड्याच्या खांद्यावर टी 20 च्या नेतृत्वाची धुरा असणार आहे. या दौऱ्यासाठी विराट कोहली आणि रोहित शर्माला विश्रांती देण्यात आली आहे.