
राहुल द्रविड भाजपच्या कार्यक्रमात उपस्थिती लावण्याबाबत म्हणतो...
भारताचा माजी कर्णधार आणि सध्याचा भारतीय संघाचा प्रमुख प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) या भाजप युवा मोर्चाच्या (BJP Yuva Morcha) एका कार्यक्रमात सहभागी होणार असे वृत्त वाऱ्यासारखे पसरले होते. त्यावर आता राहुल द्रविडने खुलासा केला आहे. निवडणुका होऊ घातलेल्या हिमाचल प्रदेशमध्ये भाजपच्या युवा मोर्चाचा एक कार्यक्रम या आठवड्यात होणार आहे. त्या कार्यक्रमात राहुल द्रविड देखील सहभागी होणार असल्याचे भाजपच्या एका नेत्यानेच सांगितले होते. त्यावर राहुल द्रविडने हे वृत्त चुकीचे (Incorrect) असल्याचे सांगितले.
हेही वाचा: ऑस्ट्रेलिया वर्ल्डकपपूर्वी T20 मालिकेसाठी भारतात येणार... पाहा वेळापत्रक
राहुल द्रविडने एएनआय या वृत्तसंस्थेला सांगितले की, 'काही माध्यमे मी हिमाचल प्रदेशातील (Himachal Pradesh) धर्मशाला येथे होणाऱ्या भाजप युवा मोर्चाच्या कार्यक्रमात सामील होणार वृत्त देत आहेत. हा कार्यक्रम 12 ते 15 मे दरम्यान होणार आहे असे ते सांगत आहेत. मी हे स्पष्ट करू इच्छितो की हे वृत्त चुकीचे आहे.'
यापूर्वी आजच भाजपचे धर्मशालाचे आमदार विश्वास नाहेरिया (Vishal Naheria) यांनी दावा केला होता की 12 मे ते 15 मे दरम्यान, भाजप युवा मोर्चाच्या बैठकीत राहुल द्रविड देखील भाग घेणार आहे. नाहेरिया यांनी एएनआयला सांगितले की, द्रविडच्या उपस्थितीमुळे युवकांना राजकारणातच नाही तर इतर क्षेत्रातही प्रगती करू शकता. या राज्यात या वर्षीच विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत.
हेही वाचा: KKR च्या मॅनेजमेंटची सिलेक्शन मध्ये लुडबुड; श्रेयस अय्यर संतापला
नाहेरिया म्हणाले की, 'भाजप युवा मोर्चाची राष्ट्रीय कार्यकारणी समितीची बैठक धर्मशाला येथे 12 मे ते 15 मे दरम्यान होणार आहे. भाजपचे राष्ट्रीय नेतृत्व आणि हिमाचल प्रदेशचे वरिष्ठ नेतृत्व देखील यात सामील होणार आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आणइ केंद्रीय मंत्री देखील या सत्रात सहभागी होणार आहेत.'
Web Title: Rahul Dravid Says News Of Attending Bjp Program Is Incorrect
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..