Rahane Reaction on Dravid | मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडबद्दल अजिंक्य रहाणेचं मोठं विधान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rahul-Dravid-Ajinkya-Rahane

पहिल्या कसोटीसाठी अजिंक्य रहाणे संघाचा कर्णधार

मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडबद्दल अजिंक्य रहाणेचं मोठं विधान

sakal_logo
By
विराज भागवत

कानपूर : न्यूझीलंडविरुद्धची कसोटी मालिका सुरू झाली आणि भारताने पहिल्या दिवसअखेर २५८ धावांपर्यंत मजल मारली. भारतीय संघासाठी पहिल्यांदाच कसोटी सामन्यात द्रविड मुख्य कोच असणार आहे. त्यातच विराट आणि रोहितच्या अनुपस्थितीत अजिंक्य रहाणे कर्णधारपदी आहे. त्यामुळे रहाणेने द्रविडबद्दल महत्त्वाचं विधान केलं.

हेही वाचा: IND vs NZ 1st Test शुबमन गिलचा अर्धशतकी 'चौकार'

"राहुल द्रविड यांच्याबरोबर काम करायला मजा येते. त्यांचा सर्वांत मोठा गुण म्हणजे ते सर्व खेळाडूंना समानतेने, बरोबरीने वागवतात. खेळाडूंच्या कामगिरीवर त्यांचे संबंध अवलंबून नसतात. उलट खराब कामगिरी करणाऱ्या खेळाडूशी ते जास्त प्रेमाने बोलतात, त्याला पाठिंबा देतात. संघावर त्याचा सकारात्मक परिणाम होईल", असा विश्‍वास अजिंक्य रहाणेने व्यक्त केला.

हेही वाचा: IND vs NZ 1st Test शुबमन गिलचा अर्धशतकी 'चौकार'

ajinkya rahane

ajinkya rahane

"कसोटी मालिकेत प्रमुख सहा खेळाडू नाहीत हे सत्य आहे आणि त्यांची उणीव जाणवेल, पण ज्या खेळाडूंना त्यांच्या जागी संधी मिळणार आहे, त्याचे जास्त मोल वाटते मला कर्णधार म्हणून. श्रेयस अय्यरला कसोटी पदार्पण करायची संधी मिळणार आहे. खरे सांगू, मला ना माझ्या फॉर्मची चिंता आहे ना सलामीची. आम्ही मस्त तयारी केली आहे. न्यूझीलंड संघ दर्जेदार आहे. त्यांच्याकडे भारतात खेळायचा अनुभव आहे. आम्हाला संघ म्हणून त्यांच्याबद्दल आदर आहे", असे अजिंक्य रहाणेने भावना व्यक्त करताना सांगितले.

हेही वाचा: IND vs NZ : कानपूरच्या मैदानावर मुंबईकर क्रिकेटरचीच हवा!

योजना आखून राबवण्याचा सल्ला

मला संघाचे नेतृत्व करायला मिळते तेव्हा मोठा सन्मान वाटतो. राहुल द्रविड यांनी मला सांगितले आहे, की योजना आखून त्या राबवण्याचा विचार कर. फलंदाजी कशी होईल याचा विचार करू नकोस. मला वाटते, की ही नवीन मालिका सुरू होत आहे. आम्ही दौऱ्यावर गेलो असताना किंवा टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात काय केले याचा विचार करून बदला घेण्याचा विचार करणार नाही. कर्णधार नात्याने माझे लक्ष परिपूर्ण चांगले क्रिकेट सातत्याने खेळण्यावर असेल, असे ध्येय पुढे अजिंक्य रहाणेने बोलून दाखवले.

loading image
go to top