द्रविड दुकानात आला अन् शांतपणे मागच्या रांगेत बसला, फॅन करतायत कौतुक |Rahul Dvid Picture in book event sitting in last row viral picture | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rahul Dvid Picture in book event sitting in last row
द्रविड दुकानात आला अन् शांतपणे मागच्या रांगेत बसला

द्रविड दुकानात आला अन् शांतपणे मागच्या रांगेत बसला, फॅन करतायत कौतुक

टीम इंडियाचा हेड कोड राहुल द्रविड हा त्याच्या साधेपणासाठी ओळखले जातो. द वॉल आफ टीम इंडिया म्हणून ओळखला जाणारा द्रविड सध्या एका गोष्टीमुळे चर्चेत आला आहे. क्रिकेटच्या इतिहासात राहुल द्रविड हा एक खेळाडू, एक प्रशिक्षक म्हणून सर्वांपेक्षा हटके आहे. तो त्याच्या शांत स्वभावामुळे सर्वांचे मनं जिंकत आला आहे. अशातच सध्या त्याचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

सोशल मीडियावर द्रविडचा एक फोटो सध्या व्हायरल होताना दिसत आहे. या फोटोमध्ये तो एका पुस्तकाच्या दुकानात दिसत आहे. तो एका सामान्य माणसाप्रमाणे पुस्तकाच्या दुकाना खुर्चीवर बसला असल्याचे पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे त्याच्या साधेपणामुळे त्याला तेथे कोणीच ओळखले नाही.

हेही वाचा: राहुल द्रविड भाजपच्या कार्यक्रमात उपस्थिती लावण्याबाबत म्हणतो...

द्रविड सध्या टीम इंडियाचा मुख्य कोच आहे. मात्र, त्याने त्याचा साधेपणा कधीच सोडला नाही. बिना प्रोटोकॉल तो एका पुस्तकाच्या दुकानात बिनधास्तपणे बसला असल्याचे पाहायला मिळाले. त्याचा साधेपणा पाहता तो कोणालाचा ओळखला नाही. आणि ज्यांना त्याची ओळख पटली त्यांच्या डोळ्यावर विश्वास बसेना अशी परिस्थिती त्या पुस्तकाच्या दुकानामध्ये निर्माण झाली होती.

सोशल मीडियावर मिळालेल्या माहितीनुसार, राहुल द्रविड माजी खेळाडून गुणप्पा विश्वनाथ यांच्या नवा पुस्तकासंदर्भात चर्चा करण्यासाठी पोहचले होते. जीआर विश्वनाथ नविन पुस्तक रिस्ट यश्योर्डसंदर्भात चर्चा करण्यासाठी उपस्थित होते.

या कार्यक्रमादरम्यान, द्रविड मास्क परिधान करुन कार्यक्रम स्थळी पोहचले आणि गुपचुप मागीज बाजूस खुर्चीत जाऊन बसले. त्यांच्या या गुपचुपपणामुळे कोणालाच कोणालाच जाणीव झाली नाही की ते तिथं बसले आहेत. त्याच्या शेजारी एक महिला होती. तिला आपल्या शेजारी द्रविड बसलेत याची जाणीव देखील झाली नाही.

त्या महिलेने ट्विट करत द्रविडसोबत घडलेला किस्सा आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. जेव्हा लोकांना द्रविड उपस्थित असल्याची माहिती कळाली तेव्हा त्याच्या चाहत्यांनी धाव घेतली आणि ऑटोग्राफची मागणी केली.

Web Title: Rahul Dvid Picture In Book Event Sitting In Last Row Viral Picture

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top