ENG vs IRE : बटलरची भीती ठरली खरी! झुंजार आयर्लंडने बलाढ्य इंग्लंडला दिली मात

Ireland Defeat England In T20 World Cup 2022
Ireland Defeat England In T20 World Cup 2022esakal

Ireland Defeat England In T20 World Cup 2022 : टी 20 वर्ल्डकप 2022 मध्ये पात्रता फेरीतून वर आलेल्या आयर्लंडने विजेतेपदाचे दावेदार असलेल्या इंग्लंडला 5 विकेट्सनी पराभव करत मोठा धक्का दिला. जरी या सामन्याचा निकाल डकवर्थ लुईस नियमानुसार लागला असला तरी आयर्लंडने इंग्लंडला फलंदाजी आणि गोलंदाजी करतानाही चांगलेच झुंजवले होते. विशेष म्हणजे इंग्लंडचा कर्णधार जॉश बटलरने सामन्यापूर्वीच आयर्लंड आम्हाला या सामन्यात कडवी टक्कर देऊ शकतो असे म्हणाला होता. त्याची ही भीती आयर्लंडने खरी करून दाखवली.

Ireland Defeat England In T20 World Cup 2022
Hardik Pandya : नेदरलँडविरूद्धच्या सामन्यात पांड्याला विश्रांती? प्रशिक्षक पारस म्हाम्ब्रे म्हणाले...

पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या आयर्लंडने कर्णधार बालबिर्नेच्या झुंजार 62 धावांच्या जोरावर इंग्लंडसमोर 158 धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र इंग्लंडचा निम्मा संघ 86 धावात माघारी धाडत आयर्लंडने इंग्लंडच्या बलाढ्य फलंदाजीला चांगलेच झुंजवले. दरम्यान मोईन अलीने आक्रमक फलंदाजी करत संघाला 14.3 षटकात 105 धावांपर्यंत पोहचवले. मात्र पावसामुळे सामना थांबला आणि डकवर्थ लुईस नियमानुसार इंग्लंड 5 धावांनी पराभूत झाली. आयर्लंडकडून जोशुआ लिटिलने 2 बळी घेतले. तर हँड आणि बॅरी मॅकार्थे यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

इंग्लंडकडून डेविड मलानने सर्वाधिक 35 धावा केल्या. तर मोईन अलीने 12 चेंडूत नाबाद 24 धावा करत इंग्लंडला पराभवापासून वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचे प्रयत्न 5 धावांनी कमी पडले. कर्णधार जोस बटलर शुन्यावर तर स्टार बेन स्टोक्स 6 धावा करून बाद झाला.

Ireland Defeat England In T20 World Cup 2022
Phil Simmons : वेस्ट इंडीजचे प्रशिक्षक फिल सिमॉन्स यांनी दिला राजीनामा

टी वर्ल्डकपच्या ग्रुप 1 मधील इंग्लंड आणि आयर्लंड यांच्यातील इंग्लंडने आयर्लंडचा डाव 157 धावात संपवला. आयर्लंडने पहिल्या 10 षटकात इंग्लंडच्या गोलंदाजांचा चांगला समाचार घेतला. आयर्लंडकडून सलामीवीर आणि कर्णधार अँड्र्यू बालबिर्निनेने 47 चेंडूत 62 धावांची दमदार खेळी करत संघाला 12 षटकात 2 बाद 103 धावांपर्यंत पोहचवले. मात्र त्यानंतर मार्क वूड, लिम लिव्हिंगस्टोन आणि सॅम करन यांनी दमदार गोलंदाजी करत आयर्लंडचा डाव 157 धावात संपवला. इंग्लंडकडून मार्क वूड आणि लिम लिव्हिंगस्टोनने प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या. तर सॅम करनने 2 विकेट्स घेत त्यांना चांगली साथ दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com