Hardik Pandya : नेदरलँडविरूद्धच्या सामन्यात पांड्याला विश्रांती? प्रशिक्षक पारस म्हाम्ब्रे म्हणाले... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bowling Coach Paras Mhambrey  Give Update on Hardik Pandya

Hardik Pandya : नेदरलँडविरूद्धच्या सामन्यात पांड्याला विश्रांती? प्रशिक्षक पारस म्हाम्ब्रे म्हणाले...

Hardik Pandya : हार्दिक पांड्याने टी 20 वर्ल्डकप 2022 मधील भारत पाकिस्तान सामन्यात दमदार कामगिरी केली. हार्दिक पांड्याने विराट कोहलीसोबत पाचव्या विकेटसाठी 113 धावांची शतकी भागीदारी रचली. त्यात 40 धावांचे योगदान दिले. याचबरोबर गोलंदाजीतही 30 धावात 3 विकेट्स घेत पाकिस्तानला 159 धावात रोखण्यात मोलाचा वाटा उचलला. दरम्यान, उद्या 27 ऑक्टोबरला नेदरलँडविरूद्धच्या सामन्यात त्याला विश्रांती देण्यात येणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. भारताचे गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हाम्ब्रे यांनी पांड्याला विश्रांती देण्यात येणार की नाही याबाबत माहिती दिली.

हेही वाचा: ENG vs IRE : बालबिर्नेची झुंजार खेळी मात्र इंग्लंडने केले जोरदार पुनरागमन

पारस म्हाम्ब्रे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, 'हार्दिक पांड्या हा ठणठणीत असून तो खेळण्यासाठी फिट आहे. आम्ही कोणालाही विश्रांती देणार नाहीये. आम्हाला स्पर्धेत आता लय सापडली आहे. खेळाडूंचा वैयक्तिक फॉर्म देखील महत्वाचा आहे. हार्दिक पांड्या सगळे सामने खेळू इच्छितो. आम्ही कोणाला विश्रांती द्यायची याबाबत अद्यप विचार केलेला नाही. तो आमच्यासाठी महत्वाचा खेळाडू आहे. तो आमच्यासाठी गोलंदाजी आणि फलंदाजी देखील करतोय. याचबरोबर त्याचा मैदानावरील वावर देखील तितका महत्वाचा आहे.'

हेही वाचा: Phil Simmons : वेस्ट इंडीजचे प्रशिक्षक फिल सिमॉन्स यांनी दिला राजीनामा

म्हाम्बे पुढे म्हणाले की, 'विराट कोहलीने सामना संपवून दिला. मात्र विराटच्या खेळीचे श्रेय हार्दिक पांड्याला देखील जाते. ज्यावेळी तो फलंदाजीला गेला होता त्यावेळी परिस्थिती वेगळी होती. आमच्या चार विकेट्स आधीच गेल्या होत्या. ती एक आव्हानात्मक परिस्थिती होती. हार्दिक पांड्याच्या अनुभवाला तोड नाही.'