रमीझ राजा उत्पन्नासाठी भारताच्या लागलेत हात धुवून मागे? | Rameez Raja propose Four Nations T20 Series | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rameez Raja propose Four Nations T20 Super Series
रमीझ राजा उत्पन्नासाठी भारताच्या लागलेत हात धुवून मागे?

रमीझ राजा उत्पन्नासाठी भारताच्या लागलेत हात धुवून मागे?

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे नवनियुक्त अध्यक्ष रमीझ राजा (Rameez Raja) हे पाकिस्तानमधील क्रिकेट रुळावर आणण्यासाठी आकाश पाताळ एक करत आहेत. तगड्या संघांनी पाकिस्तानचा दौरा करावा यासाठी ते पहिल्या दिवसापासूनच मेहनत घेत असल्याचे दिसते. मात्र पाकिस्तानातील (Pakistan) असुरक्षित वातावरण तर कधी कोरोनाचा कहर यामुळे तगडे संघ दौरा स्थगित करत आहे किंवा अर्ध्यावर सोडून जात आहेत. (Rameez Raja propose Four Nations T20 Series)

हेही वाचा: विराटकडून चाहत्यांबरोबरच वामिकाचीही निराशा

अशा परिस्थिती पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (Pakistan Cricket Board) उत्पन्न वाढवण्याचे मोठे आव्हान पाकिस्तान क्रिकेट बोर्डासमोर उभे ठाकले आहे. अशा परिस्थिती पीसीबीच्या अध्यक्षांना शेजार आठवला. रमीझ राजा यांनी मंगळवारी आयसीसीकडे (ICC) एक मागणी केली आहे. त्यांनी आयसीसीने चार देशांची एक टी २० स्पर्धा आयोजित करावी असे सुचवले आहे. या चार देशांमध्ये भारत आणि पाकिस्तान यांचाही समावेश आहे.

रमीझ राजा (Rameez Raja) यांनी प्रत्येक वर्षी भारत, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया (Australia) आणि इंग्लंड (England) या चार संघात एक टी २० मालिका खेळली जावी असे मत व्यक्त केले. रमीझ राजा यांना ही मालिका वास्तवात व्हावी असे वाटते. त्यांनी याबाबतचे उत्पन्नाचे मॉडेलही (revenue model) समोर ठेवले. ते म्हणाले की, आयसीसी या मालिकेतून मिळणारे उत्पन्न सर्व सदस्यांबरोबर पर्सेंटेजच्या आधारे वाटून घेऊ शकते. असे ट्विट केले आहे. रमीझ राजा यांनी ज्या चार देशांची नावे सुचवली आहेत या देशांच्या सामन्यातून चांगले उत्पन्न मिळण्याची शक्यता अधिक आहे.

हेही वाचा: 'ट्विट वाचलं तेव्हा मी रागात होतो, पण...', सिद्धार्थचा माफीनामा

भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) गेल्या टी २० वर्ल्डकपमध्ये शेवटचे एकमेकांना भिडले होते. भारताला वर्ल्डकपमध्ये पहिल्यांदा पराभूत करण्यात पाकिस्तानला यश आले होते. यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने मायदेशात अनेक मालिका आयोजित करण्याचा प्रयत्न केला. त्यातील काही प्रयत्न यशस्वीही झाले. काही संघांनी कोरोनामुळे तर काहींनी सुरक्षेच्या कारणास्तव पाकिस्तानचा दौरा अर्ध्यावर सोडला.

पाकिस्तान या वर्षी ऑस्ट्रेलियाला विरुद्धची मालिका मायदेशात आयोजित करणार आहे. (Australia Tour Of Pakistan) ऑस्ट्रेलिया १९९८ नंतर पहिल्यांदाच पाकिस्तानचा दौरा करणार आहे. भारताने पाकिस्तान दहशतवादाचा पुरस्करता असल्याने त्याच्याबरोबरच्या सर्व द्विपक्षीय क्रीडा स्पर्धा न खेळण्याचा निर्णय घेतला आहे.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top