Ramiz Raja : रमीझ राजा म्हणतात, आता कुठं भारतानं पाकिस्तानला आदर देणं सुरू केलयं...

Ramiz Raja Statement About India Respect
Ramiz Raja Statement About India Respect esakal

Ramiz Raja Statement About India Respect : भारत आणि पाकिस्तान मेलबर्नमध्ये 23 ऑक्टोबरला एकमेकांना भिडणार आहेत. टी 20 वर्ल्डकपच्या या सामन्याकडे संपूर्ण क्रिकेट जगताचे लक्ष लागून राहिले आहे. सामन्याला एक महिना अवकाश असातानाच सामन्याची संपूर्ण तिकीटं विकली गेली होती. पाकिस्तानने गेल्या टी 20 वर्ल्डकपमध्ये भारताला मात दिली होती. भारत पाकिस्तानकडून पहिल्यांदाच वर्ल्डकपमध्ये हरला होता. वर्षभरातच याचा बदला घेण्याची भारताला मेलबर्नमध्ये संधी चालून आली आहे.

दरम्यान, पाकिस्तानने भारताचा पराभव केल्याचा धागा पकडून पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे प्रमुख रमीझ राजा यांनी एक वक्तव्य केले. आता कुठं भारताने पाकिस्तानला आदर देण्यास सुरूवात केली आहे असे ते म्हणाले. भारताला कडवी टक्कर देणाऱ्या बाबर आझमच्या नेतृत्वातील संघाला याबाबतचे श्रेय दिले गेले पाहिजे असे रमीझ राजा म्हणतात.

Ramiz Raja Statement About India Respect
T20 World Cup : जडेजा-बुमराहच्या दुखापतीवर रवी शास्त्रीची तिखट प्रतिक्रिया,"ही तर संधी..."

डॉनला दिलेल्या मुलाखतीत रमीझ राजा म्हणाले की, 'भारत - पाकिस्तान हा सामना तुमच्या गुणवत्तेपेक्षा मानसिकतेवर खेळला जातो. एखादा छोटा संघ देखील मोठ्या संघाला हरवू शकतो. जर एखादा छोटा संघ कोणत्याही परिस्थितीत हार न मानता खेळण्याची मानसिकता ठेवत असतील तर तो मोठ्या संघाला देखील मात देऊ शकतो. वर्ल्डकपमध्ये भारताविरूद्ध पाकिस्तान कायम अंडर डॉग्ज असतात. मात्र आता त्यांनी उशिरा का असेना आपल्याला आदर देण्यास सुरूवात केली आहे. यापूर्वी त्यांना असे वाटायचे की पाकिस्तान त्यांना हरवू शकत नाही.'

रमीझ राजा पुढे म्हणाले, 'या बदललेल्या परिस्थितीचे श्रेय आपण सध्याच्या पाकिस्तान संघाला दिलं पाहिजे. आपण एका धनाड्य क्रिकेट उद्योगाला पराभूत केलं आहे. मी अनेक वर्ल्डकप खेळलो आहे. मात्र आम्हाला भारताला पराभूत करणे जमले नाही. त्यामुळे या पाकिस्तान संघाचं कौतुक केलं पाहिजे. आमच्याकडे संसाधनांची कमतरता आहे तरी आम्ही त्यांना चांगली लढत देत आहोत.'

Ramiz Raja Statement About India Respect
National Sport : भारताचा हरमनप्रीत सर्वोत्तम पुरुष हॉकीपटू पुरस्कार पटकवणारा चौथा खेळाडू

आशिया कपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांनी एकमेकांना पराभूत करत बरोबरी साधली होती. भारताने ग्रुप स्टेजमध्ये पाकिस्तानला मात दिली तर पाकिस्तानने सुपर 4 मध्ये भारताला मात देत बरोबरी साधली होती. आता याचा पुढचा अंक 23 ऑक्टोबरला मेलबर्नमध्ये दिसणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com