महाराष्ट्राला पहिल्या डावात मोठी आघाडी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 15 नोव्हेंबर 2016

नौशादपाठोपाठ बावणेचेही शतक, विदर्भाची सावध सुरवात
नागपूर - पहिल्या डावात ५९ धावांत बाद होण्याची नामुष्की झेलणाऱ्या विदर्भाने चुकांपासून धडा घेत दुसऱ्या डावात १ बाद १४१ अशी दमदार मजल मारली खरी; पण त्यांचे हे प्रयत्न सामना वाचविण्यासाठी कितपत फलदायी ठरतील, हे पुढील दोन दिवसच ठरवतील. ऐतिहासिक ईडन गार्डन्सवर सुरू असलेल्या चारदिवसीय रणजी करंडक (‘ब’ गट) सामन्यात महाराष्ट्रने विदर्भावर २७३ धावांची विशाल आघाडी घेत निर्णायक विजयाच्या दिशेने भक्‍कम पाऊल टाकले आहे. 

पहिल्या दिवसाच्या ओलसर खेळपट्‌टीचा अंदाज बांधण्यात अपयशी ठरलेल्या विदर्भाच्या आर. संजय आणि कर्णधार फैज फजलने दुसऱ्या डावात सावध पवित्रा घेतला. दोघांनी सलामीला शतकी (१४१ धावा) भागीदारी करून सामना वाचविण्याच्या दिशेने प्रयत्न सुरू केले आहेत. त्यांना उर्वरित फलंदाजांकडून कितपत साथ मिळते, यावर सामन्याचा निकाल अवलंबून राहील. संजय-फजल जोडीने अनुपम संकलेचासह महाराष्ट्रच्या सर्वच गोलंदाजांना वर्चस्व राखण्याची संधीच दिली नाही. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा फैज ५३ आणि गणेश सतीश शून्यावर खेळत होता.

पहिल्या दिवसाच्या ३ बाद २४० वरून मैदानात उतरलेल्या महाराष्ट्रचा पहिला डाव ३३२ धावांत आटोपला. महाराष्ट्रला २७३ धावांची आघाडी मिळवून देण्यात शतकवीर नौशाद शेख (१२७ धावा) आणि अंकित बावणे (१११ धावा) यांचे उल्लेखनीय योगदान राहिले. दोघांनी चौथ्या गड्यासाठी केलेल्या २०१ धावांच्या भागीदारीने महाराष्ट्र या मोसमातील संभाव्य विजयाच्या उंबरठ्यावर आहे. विदर्भाकडून युवा मध्यमगती गोलंदाज ललित यादवने लागोपाठ दुसऱ्या सामन्यात पाच गडी बाद करून सर्वांना प्रभावित केले. 

संक्षिप्त धावफलक 
विदर्भ पहिला डाव - सर्वबाद ५९, महाराष्ट्र पहिला डाव : सर्वबाद ३३२ ( नौशाद शेख १२७, अंकित बावणे १११, अनुपम संकलेचा १९, निकित धुमाळ १५, ललित यादव ५-८१, श्रीकांत वाघ ४-८२, अक्षय वखरे १-६१). विदर्भ दुसरा डाव : १ बाद १४१ (संजय रामास्वामी ६७, फैज फजल खेळत आहे ५३, गणेश सतीश खेळत आहे ०, अनुपम संकलेचा १-३५).

Web Title: ranaji karandak cricket competiton