Ruturaj Gaikwad : ऋतुराजचा तांडव ठोकले वादळी शतक

ऋतुराज गायकवाड' पुन्हा एकदा चमकला'
Ranji Trophy 2022-23 ruturaj gaikwad
Ranji Trophy 2022-23 ruturaj gaikwad

Ruturaj Gaikwad Ranji Trophy 2022-23 : ऋतुराज गायकवाडची दमदार शतकी खेळी आणि केदार जाधव व अझीम काझी यांच्या अर्धशतकी खेळींच्या जोरावर महाराष्ट्राने येथे सुरू असलेल्या रणजी करंडकाच्या एलिट विभागातील ब गटाच्या तमिळनाडूविरुद्धच्या लढतीत पहिल्या दिवसअखेरीस ६ बाद ३५० धावा फटकावल्या.

Ranji Trophy 2022-23 ruturaj gaikwad
IND vs SL : रोहितचे हुकले मात्र विराटने ठोकले शतक; लंकेसमोर ठेवले न झेपणारे आव्हान

तमिळनाडूने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. सिद्धेश वीर (९ धावा) व राहुल त्रिपाठी (७ धावा) यांच्याकडून निराशा झाली. त्यानंतर केदारने मागील लढतीतील फॉर्म याही लढतीत कायम ठेवला; पण विजय शंकरच्या गोलंदाजीवर तो बाद झाला. त्यामुळे मोठ्या खेळीपासून तो दूर राहिला. केदारने आपली ५६ धावांची खेळी ५ चौकार व २ षटकारांनी सजवली. ४५ धावांची खेळी करणाऱ्या अंकित बावणेला संदीप वॉरियर याने बाद केले.

Ranji Trophy 2022-23 ruturaj gaikwad
IND vs SL 1st ODI : कर्णधार शानकाने शतकी खेळी करत भारताचा विजय लांबला 50 व्या षटकापर्यंत

डाव सावरला

महाराष्ट्राची अवस्था ६ बाद २०८ धावा अशी झाली. साई किशोरने आशय पालकरला बाद केले. त्यामुळे महाराष्ट्राचा संघ संकटात सापडला होता; पण ॠतुराज गायकवाड व अझीम काझी या जोडीने १४२ धावांची नाबाद भागीदारी करताना महाराष्ट्राचा डाव सावरला. ऋतुराजने १२६ चेंडूंमध्ये १६ चौकार व ३ षटकारांसह नाबाद ११८ धावांची खेळी केली. अझीमने ११९ चेंडूंमध्ये ६ चौकार व ४ चौकारांनी नाबाद ८७ धावांची खेळी साकारली. तमिळनाडूकडून लक्ष्मीनारायणन याने ८० धावा देत २ फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. महाराष्ट्राची मदार आता उद्या ॠतुराज व अझीम यांच्यावरच असणार आहे.

संक्षिप्त धावफलक ः

महाराष्ट्र पहिला डाव ६ बाद ३५० धावा (ऋतुराज गायकवाड खेळत आहे ११८ - १२६ चेंडू, १६ चौकार, ३ षटकार, केदार जाधव ५६, अंकित बावणे ४५, अझीम काझी नाबाद ८७, लक्ष्मीनारायणन विघ्नेश २/८०, संदीप वॉरियर १/७२, रवी श्रीनिवासन साई किशोर १/६५, विजय शंकर १/४१) वि. तमिळनाडू.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com