मुंबईच्या सुवेद पारकरचे पदार्पणातच द्विशतक; कोचच्या विक्रमाशी बरोबरी

Ranji trophy 2022 Suved Parkar Debut Double Century Equal Coach Amol Muzumdar Record
Ranji trophy 2022 Suved Parkar Debut Double Century Equal Coach Amol Muzumdar Recordesakal

नवी दिल्ली : रणजी ट्रॉफीच्या (Ranji trophy 2022) उपांत्य पूर्व फेरीत मुंबईने दमदार सुरूवात केली. मुंबईच्या पदार्पण करणाऱ्या सुवेद पारकरने (Suved Parkar) सामन्याच्या दुसऱ्या दिवशी आपले द्विशतक पूर्ण केले. याचबरोबर त्याने मुंबईकडून रणजी ट्रॉफीमध्ये पदार्पणात द्विशतकी खेळी करणाऱ्या आपल्या कोच अमोल मुजूमदारच्या विक्रमाशी बरोबरी केली.

Ranji trophy 2022 Suved Parkar Debut Double Century Equal Coach Amol Muzumdar Record
सर्फराजचा मोठा विक्रम; सरासरीत ब्रॅडमन यांच्यानंतर पटकावला दुसरा क्रमांक

उत्तराखंड विरूद्धच्या सामन्यात सुवेद पारकरने 252 धावांची मोठी खेळी केली. त्याने आपल्या या खेळीत 21 चौकार आणि 4 षटकार मारले. शेवटपर्यंत सुवेद पारकरला बाद करणे उत्तराखंडच्या गोलंदाजांना काही जमले नाही. यापूर्वी अमोल मुजूमदारने (Amol Muzumdar) 1994 मध्ये हरियाणाविरूद्धच्या आपल्या पदार्पणाच्या सामन्यात 260 धावांची खेळी केली होती.

आता सुवेद हा मुंबईकडून पदार्पणाच्या रणजी सामन्यात द्विशतक झळकावणारा दुसरा खेळाडू ठरला आहे. तर संपूर्ण देशातील 12 वा खेळाडू ठरला आहे. तर यंदाच्या हंगामातील पदार्पणात द्विशतकी खेळी किंवा त्यापेक्षा जास्त धावा करणारा सुवेद तिसरा फलंदाज ठरला. यापूर्वी सकिबुल गनीने 341 तर महाराष्ट्राच्या पवन शहाने 219 धावा केल्या होत्या.

Ranji trophy 2022 Suved Parkar Debut Double Century Equal Coach Amol Muzumdar Record
इंग्लंडच्या जो रूटची स्तुती करून 'दादा' चांगलाच फसला; ट्विटरवर झाला ट्रोल

सामन्याचा विचार केला तर मुंबईने आपला पहिला डाव 8 बाद 647 धावांवर घोषित केला. मुंबईचा कर्णधार पृथ्वी शॉला 21 धावाच करता आल्या. सुवेद बरोबर सर्फराज खानने देखील दमदार शतकी खेळी केली. त्याने 205 चेंडूत 153 धावा केल्या. दरम्यान, दुसऱ्या दिवसअखेर मुंबईने उत्तराखंडचे दोन फलंदाज देखील बाद केले आहेत. दिवसाचा खेळ संपला त्यावेळी उत्तराखंड 2 बाद 39 धावा झाल्या होत्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com