Ranji Trophy 2023 : अखेर दिल्लीनं 43 वर्षानंतर करून दाखवलं; सर्फराजचं झुंजार शतकही गेलं वाया | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ranji Trophy 2023 Delhi Vs Mumbai

Ranji Trophy 2023 : अखेर दिल्लीनं 43 वर्षानंतर करून दाखवलं; सर्फराजचं झुंजार शतकही गेलं वाया

Ranji Trophy 2023 Delhi Vs Mumbai : रणजी ट्रॉफी 2023 मध्ये दिल्ली विरूद्ध मुंबई सामन्यात स्टार फलंदाज सर्फराज खानने पहिल्या डावात 125 धावांची झुंजार खेळी केली होती. मात्र तरी देखील मुंबईला दिल्लीविरूद्धचा पराभव टाळता आला नाही. दिल्लीने मुंबईचा 8 विकेट्सनी पराभव करत सामन्यात निर्विवाद वर्चस्व गाजवले. विशेष म्हणजे दिल्लीने 1979 - 80 नंतर म्हणजे तब्बल 43 वर्षांनी रणजी ट्रॉफी सामन्यात दिल्लीने मुंबईचा आऊटराईट विजय मिळवला आहे.

हेही वाचा: Brij Bhushan Sharan Singh : राज ठाकेरच काय बृजभूषण सिंहांमुळे मायावतींना मुख्यमंत्री असूनही घ्यावी लागली होती माघार

दिल्लीच्या अरूण जेटली स्टेडियमवर झालेल्या दिल्ली विरूद्ध मुंबई सामन्यात प्रथम फंलदाजी करणाऱ्या मुंबईने सर्वबाद 293 धावा केल्या होत्या. मुंबईकडून मधल्या फळीतील फलंदाज सर्फराज खानने 155 चेंडूत 125 धावांची झुंजार शतकी खेळी केली. मुंबईकडून पृथ्वी शॉने 40 तर शम्स मुल्लाणीने 39 धावांचे योगदान दिले होते. दिल्लीकडून पहिल्या डावात प्रानशू विजयरान याने 4 विकेट्स घेतल्या होत्या.

दिल्लीने पहिल्या डावात 369 धावा केल्या. दिल्लीकडून रावळने 114 धावांची शतकी खेळी केली. तर कर्णधार हिम्मत सिंहने 85 धावा केल्या. मुंबईकडून तुषार देशपांडेने 4 तर शम्स मुल्लाणीने 3 विकेट्स घेतल्या. पहिल्या डावात दिल्लीने 76 धावांची आघाडी घेतली.

हेही वाचा: Kaviya Maran: काव्या मारन होणार दक्षिण आफ्रिकेची सून? SA20 लीगमधील तो VIDEO व्हायरल

दरम्यान, दुसऱ्या डावात मुंबईची कसलेली फलंदाजी ढेपाळली. मुंबईचा संपूर्ण संघ 170 धावात पॅव्हेलियनमध्ये परतला. दिल्लीकडून आपला दुसराच प्रथम श्रेणी सामना खेळणाऱ्या दिविज मेहराने 30 धावात मुंबईचा निम्मा संघ गारद केला. मुंबईकडून फक्त तनुष कोटियान (50) आणि कर्णधार अजिंक्य रहाणे (51) अर्धशतकी खेळी करता आली.

दिल्लीने सामन्याच्या शेवटच्या दिवशी मिळालेल्या 95 धावांचे माफक आव्हान दोन फलंदाजांच्या मोबदल्यात पार केले. दिल्लीकडून ऋतिक शौकीन आणि वैभव शर्मा यांनी प्रत्येकी 36 धावांचे योगदान दिले.

(Sports Latest News)

हेही वाचा : मेडिकल मॅनेजमेंटही हृदयविकारावर ठरु शकते उपाय