Ranji Trophy 2026 : थोडी खुशी जादा गम! उत्तरप्रदेशला नमवूनही विदर्भ संघ स्पर्धेबाहेर, मोखाडे अन् मालेवार विजयाचे शिल्पकार

Vidarbha Beat Uttar Pradesh But Miss Knockouts : विजयानंतरही विदर्भ संघ बादफेरीसाठी पात्र ठरू शकला नाही. त्यामुळे विदर्भासाठी हा विजय ‘थोडी खुशी जादा गम’ असाच ठरला.
Ranji Trophy 2026

Ranji Trophy 2026

esakal

Updated on

नागपूर, ता. १ : फॉर्ममध्ये असलेला अमन मोखाडे व दानिश मालेवारच्या अर्धशतकी खेळींच्या जोरावर गतविजेत्या विदर्भाने रणजी करंडक (एलिट ‘अ’ गट) क्रिकेट स्पर्धेतील शेवटच्या साखळी सामन्यात उत्तरप्रदेशचा चार गड्यांनी पराभव केला. मात्र या विजयानंतरही विदर्भ संघ बादफेरीसाठी पात्र ठरू शकला नाही. त्यामुळे विदर्भासाठी हा विजय ‘थोडी खुशी जादा गम’ असाच ठरला. झारखंडने सरस धावगतीच्या आधारावर विदर्भाला मागे टाकत बादफेरीचे तिकीट पक्के केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com