Ranji Trophy : मुंबईला खुणावतेय रणजी विजेतेपद; आजपासून सुरू होणाऱ्या अंतिम सामन्यात विदर्भाचे आव्हान

यंदाच्या मोसमात कमालीच्या फॉर्मात असलेल्या मुंबईला ४२वे रणजी विजेतेपद खुणावत आहे. त्यासाठी उद्यापासून सुरू होणाऱ्या अंतिम सामन्यात त्यांना विदर्भाचा प्रतिकार मोडून काढावा लागणार आहे.
मुंबईला खुणावतेय रणजी विजेतेपद
मुंबईला खुणावतेय रणजी विजेतेपदSakal

मुंबई : यंदाच्या मोसमात कमालीच्या फॉर्मात असलेल्या मुंबईला ४२वे रणजी विजेतेपद खुणावत आहे. त्यासाठी उद्यापासून सुरू होणाऱ्या अंतिम सामन्यात त्यांना विदर्भाचा प्रतिकार मोडून काढावा लागणार आहे.

सहा वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलिया दौऱ्यात सनसनाटी मालिका विजय मिळवून देणारा त्यावेळचा हंगामी कर्णधार अजिंक्य रहाणे आता मुंबईसाठी रणजी करंडक प्रथमच जिंकून देण्यासाठी सज्ज झाला आहे.

फलंजाजीतील त्याचा स्वतःचा फॉर्म समाधानकारक नसला तरी संघातील तळातील खेळाडू मोहित अवस्थीचा फलंदाजीतील फॉर्म मुंबई संघाची ताकद वाढवणारा आहे. रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, यशस्वी जयस्वाल, सर्फराझ खान आणि शिवम दुबे असे दिग्गज खेळाडू संघात नसले तरी मुंबईचा संघ समतोल आणि तेवढ्याच क्षमतेचा आहे.

अखेरचे फलंदाज तनुष कोटियन आणि तुषार देशपांडे यांनीही शतके केल्यामुळे विदर्भसाठी मुंबईचे चक्रव्यूह भेदणे सोपे जाणार नाही. मात्र, त्यांच्याकडे माजी कसोटीवीर उमेश यादव हे वेगवान गोलंदाजीतील प्रमुख अस्र आहे.

४८व्यांदा रणजी विजेतेपद मिळवणाऱ्या मुंबईने सर्वाधिक ४१ वेळा तर विदर्भने दोनदा रणजी करंडक जिंकलेला आहे. ही विषमता असला तरी उद्यापासून मैदानावरील लढतीत दोन्ही संघ एकाच पातळीवर असतील. मानसिकता कणखर करून आपली क्षमता सिद्ध करणाऱ्या संघालाच विजेतेपदाचा करंडक उंचावता येणार आहे.

श्रेयस पुन्हा केंद्रस्थानी

दुखापतीचे कारण सांगत रणजी सामना न खेळल्यामुळे बीसीसीआयच्या वार्षिक करारातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आलेला श्रेयस अय्यर उपांत्य सामन्यात खेळला; परंतु त्याला प्रभाव पाडता आला नव्हता. भारतीय संघात पुन्हा स्थान मिळवायचे असेल तर रणजी क्रिकेट हाच पर्याय असलेला श्रेयस अय्यर पुन्हा एकदा केंद्रस्थानी असणार आहे. संधीचा जास्तीत जास्त फायदा घेण्यासाठी तो आतुर असेल.

विदर्भचाही संघ तेवढीच चांगली कामगिरी करून अंतिम सामन्यात दाखल झाला आहे. त्यांच्याकडून करुण नायर (६१६) हा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. त्यानंतर ध्रुव शौरे (५४९), अक्षय वाडकर (५३०), अथर्व तायडे (५२९) आणि यश राठोड (४५६) यांनी यंदाच्या स्पर्धेत चांगला प्रभाव पाडलेला आहे;

परंतु त्यांना शार्दुल ठाकूर, तुषार देशपांडे यांच्यासह मोहित अवस्थी या वेगवान गोलंदाजांसह तनुष कोटियन आणि शम्स मुलानी यांचा सामना करावा लागणार आहे.विदर्भच्या आदित्य सरवट (४० विकेट) आणि आदित्य ठाकरे (३३) यांनी मोसमात प्रभावी कामगिरी केली असली तरी मुंबईचा अखेरचा फलंदाजही शतक करण्याची क्षमता बाळगून आहे, त्यामुळे त्यांना तेवढेच सावध राहावे लागणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com