विराट कोहलीला धोका : ज्याला गिफ्ट केली बॅट त्यानेच घेतली विकेट

गुजरातविरुद्ध खेळताना विराटने पुनरागमन करत 72 धावांची खेळी केली. मात्र त्याची ही 73 धावांची खेळी राशिद खानने संपवली.
Virat Kohli
Virat Kohliesakal

अफगाणिस्तानचा रशिद खान आणि टीम इंडियाचा विराट कोहला यांच्यात मैदानाबाहेर मैत्रीचे नातं पाहायला मिळतं. याची प्रचित कालच्या सामन्यापूर्वी आली. काल सायंकाळी गुजरात टायटन्स विरुद्ध आरसीबीविरुद्ध सामना खेळवण्यात आला.

या सामन्यापूर्वी विराट आणि रशिदचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यामध्ये दोघेही सराव करताना दिसले आणि कोहलीने विराटला बॅट गिफ्ट केल्याची चर्चादेखील रंगली. दरम्यान, सायंकाळी झालेल्या सामन्यात रशिदने विराटची विकेट घेतली. त्यामुळे क्रिकेट जगतात विराटने ज्याला गिफ्ट केली बॅट त्यानेच घेतली विकेट अशी चर्चा सर्वत्र रंगली आहे.

Virat Kohli
विराट कोहलीने राशिदला दिले खास गिफ्ट, क्रिकेट जगतात रंगली चर्चा

काल सकाळी रशिदने आपल्या इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला होता. हा व्हिडीओ शेअर करताना विराटने त्याला गिफ्ट दिले असल्याचा उल्लेख रशिदने कॅप्शनमध्ये केला. मात्र, नेमकं काय गिफ्ट दिलं हे सांगितल नाही. व्हिडीओत दोघांच्या हातात बॅट दिसत असल्याने विराटने त्याला बॅट गिफ्ट केली असा अंदाज बांधण्यात आला.

अशातच सायंकाळी गुजरातविरुद्ध खेळताना विराटने पुनरागमन करत 72 धावांची खेळी केली. मात्र त्याची ही 73 धावांची खेळी राशिद खानने संपवली.

विराट कोहलीने महत्वाच्या सामन्यात आपला खेळ उंचावत अर्धशतक ठोकले. त्याने 33 चेंडूत अर्धशतकी खेळी केली. विराट यावेळी चांगल्या फॉर्ममध्ये दिसला. विराटने 54 चेंडूत 72 धावा केल्या. यामध्ये 8 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश आहे.

Virat Kohli
RCB vs GT : टीम इंडियाची चिंता मिटली! 'विराट' खेळीने कोहली आला फार्मात

विराट आऊट झाल्यानंतर क्रिकेट जगतात रशिदसोबतच्या मैत्रीची चर्चा रंगली. एकिकडे विराट फॉर्ममध्ये दिसल्याने त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होताना दिसत आहे. तर दुसरीकडे बॅट गिफ्ट केलेल्या रशिदची चर्चा रंगली आहे.

विराटच्या 73 धावांच्या जोरावर आरसीबीने गुजरातचे 169 धावांचे आव्हान 8 गडी राखून पार केले. आरसीबी या विजयानंतर गुणतालिकेत 16 गुण मिळवत चौथ्या स्थानावर पोहचली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com