रवी दहियाची आशियाई चॅम्पियनशिपमध्ये 'सुवर्ण हॅट्ट्रिक'

रवी दहियाची आशियाई चॅम्पियनशिपमध्ये 'सुवर्ण हॅट्ट्रिक'

उलानबातर ( मंगोलिया ) : भारताचा कुस्तीपटू रवी कुमार दाहियाने (Ravi Kumar Dahiya) आशियाई चॅम्पियनशिपमध्ये (Asian Championship) सलग तिसरे सुवर्णपदक (Gold Medal) जिंकले. त्याने 57 किलो वजनीगटात दमदार कामगिरी केली. त्याने सुवर्ण पदकाच्या लढतीत कझाकिस्तानच्या रखात कालझहानला तांत्रिक अव्वलतेच्या आधारावर पराभूत केले.

रवी दहियाची आशियाई चॅम्पियनशिपमध्ये 'सुवर्ण हॅट्ट्रिक'
स्मिथची भविष्यवाणी! हे रेकॉर्ड मोडत चहल ठरणार सर्वाधिक विकेट टेकिंग बॉलर

रवी दहियाने टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत रौप्य पदकाची कमाई केली होती. आशियाई चॅम्पियनशिपमध्ये पिछाडी भरून काढत सामना जिंकला. सुरूवातीला रवी पिछाडीवर होता. त्यानंतर त्याने जोरदार कमबॅक केले. त्याने प्रतिस्पर्धी मल्लाला अत्यंत चलाखीने मात दिली. रवी दहियाची ही या हंगामातील दुसरी फायनल होती. यापूर्वी त्याने फ्रेब्रुवारी महिन्यात झालेल्या डॅन कोलोव्ह स्पर्धेत रौप्य पदकाची कमाई केली होती.

रवी दहियाची आशियाई चॅम्पियनशिपमध्ये 'सुवर्ण हॅट्ट्रिक'
बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना; जॉस बटलरच्या शतकाचा आनंद हेटमायरने व्यापला

रवी दहिया हा सोनपथ मधील निहारी गावातून येतो. त्याने आपल्या ताकदीते पुन्हा एकदा प्रदर्शन केले. त्याने जपानच्या रिकुटो आराईला पराभूत केले. त्यानंतर त्याने मंगोलियाच्या झानाबाझार झानदानबुदचा 12 - 5 असा पराभव करत फायनलमध्ये प्रवेश केला. फायनमध्ये कालझहान याने रवी दहियावर आघाडी घेतली होती. त्याने रवी दहिलाया हलण्याची फारशी संधी दिली नाही. मात्र त्यानंतर रवीने सामन्यात पुनरागमन करत पिछाडी भरून काढली आणि तांत्रिक अव्वलतेच्या जोरावर सुवर्ण पदकावर नाव कोरले. त्याने सलग सहावेळा दुहेरी गुण मिळवले. याच दरम्यान त्याने स्वतःला डाव्या पायावर हल्ला चढवण्याच्या कालझहानच्या डावपेचातूनही स्वतःला चांगल्या प्रकारे सोडवले. यानंतर रवीने या स्पर्धेतील भारताचे पहिले सुवर्ण पदक निश्चित केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com