बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना; जॉस बटलरच्या शतकाचा आनंद हेटमायरने व्यापला

हेटमायर जोस बटलरच्या शतकामुळे खूप आनंदी होता मात्र काही क्षणात आनंदाचे दु:खात रूपांतर झाले
shimron hetmyer reaction after jos buttler third ipl 2022 century cricket news
shimron hetmyer reaction after jos buttler third ipl 2022 century cricket news

IPL 2022: दिल्ली कॅपिटल्स (DC) आणि राजस्थान रॉयल्स (RR) यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्यात जोस बटलरने गोलंदाजांवर कहरच केला. जबरदस्त फॉर्ममध्ये दिसणाऱ्या बटलरची बॅट पुन्हा एकदा गर्जना करत 65 चेंडूत 116 धावा केल्या. मात्र जोस बटलरने शतक झळकावल्यावर डगआउटमध्ये एक मजेदार किस्सा पाहिला मिळाला, जी फार कमी लोकांच्या लक्षात आली आहे. जोस बटलरने शतक पूर्ण केल्यावर आनंदाने उडी मारली त्यानंतर असे झाले की. बटलरच्या शतकामुळे राजस्थान रॉयल्सचा संपूर्ण कॅम्प उभा राहिला आणि टाळ्या वाजवत होता. यादरम्यान शिमरॉन हेटमायरही जोस बटलरच्या शतकामुळे खूप आनंदी दिसला, मात्र काही क्षणात हेटमायरच्या आनंदाचे दु:खात रूपांतर झाले. (Shimron Hetmyer Reaction After Jos Buttler Century)

shimron hetmyer reaction after jos buttler third ipl 2022 century cricket news
IPL 2022: हंगरगेकरचा 'तो' फोटो व्हायरल; CSK वर चाहते नाराज
shimron hetmyer reaction after jos buttler third ipl 2022 century cricket news
चुकीला माफी नाही; पंतला मिळाली सजा, कोच आमरेंवर एका सामन्यासाठी बंदी

शिमरॉन हेटमायरने आनंदाने हवेत उडे मारण्याचा प्रयत्न केला पण त्याचा हात प्लास्टिकच्या भागावर आदळला. त्यावेळी शिमरॉन हेटमायर वेदनेने आक्रोश करताना दिसला. जोस बटलरचे आयपीएल 2022 मधील हे तिसरे शतक आहे. तत्पूर्वी दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंतने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.

जोस बटलरच्या शानदार शतकाच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने निर्धारित 20 षटकांत 2 गडी गमावून 222 धावा केल्या. जोस बटलरशिवाय देवदत्त पडिकलनेही ५४ धावांची खेळी खेळली. प्रत्युत्तरात दिल्ली कॅपिटल्स संघ 8 विकेट्सवर 207 धावाच करू शकला आणि 15 धावांनी सामना गमावला. कर्णधार पंतने 24 चेंडूत 44 धावा केल्या. तर ललित यादवने 24 चेंडूत 37 आणि रोवमनने 15 चेंडूत 36 धावा केल्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com