'दोन कफ सिरप ऑन द रॉक्स' रवी शास्त्रींची नवी जाहिरातबाजी | Ravi Shastri New Cred App Advertisement | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ravi Shastri New Cred App Advertisement

'दोन कफ सिरप ऑन द रॉक्स' रवी शास्त्रींची नवी जाहिरातबाजी

नवी दिल्ली : रवी शास्त्री (Ravi Shastri) गेल्या दोन दिवसांपासून त्यांच्या अतरंगी कपडे घालून ट्विट करण्याने चर्चेत आले होते. आज ते असे अतरंगी कपडे घालून काय करत होते याचा खुलासा झाला आहे. हा खुलासा त्यांनीच ट्विट केलेल्या एका व्हिडिओतून झाला आहे. हा व्हिडिओ क्रेडच्या (Cred App) जाहिरातीचा आहे. यापूर्वी इंदिरानगर का गुंडा फेम राहुल द्रविडने (Rahul Dravid) देखील या अॅपची जाहिरात केली होती.

हेही वाचा: निखत म्हणते, सलमान इतरांसाठी भाईजान माझ्यासाठी 'जान'

रवी शास्त्री या जाहिरातीत Advertisement) शाहरूख खानच्या प्रसिद्ध चक दे इंडिया चित्रपटातील प्रसिद्ध संवाद '70 मिनिट है तुम्हारे पास' म्हणताना दिसत आहेत. मात्र ते खेळाडूंना पार्टी करण्यासाठी हा डायलॉग म्हणत आहेत. या जाहिरातीचा व्हिडिओ शेअर करून 59 वर्षाच्या रवी शास्त्री यांनी त्याला कॅप्शन दिले की, 'मला यातील काहीच आठवत नाही.'

रवी शास्त्री हे पार्टी लव्हर असल्याचे जगजाहीर आहे. त्यांच्या यात गोष्टीचा जाहिरात करणाऱ्यांना चांगल्या प्रकारे वापर करून घेतला आहे. या व्हिडिओत रवी शास्त्री पत्रकारांना देखील ट्रोल करताना दिसत आहेत. तसेच एका सुंदर मुलीशी फ्लर्ट करण्याचा प्रयत्न करतात. हा व्हिडिओ खूप मजेशीर आहे. या व्हिडिओत रवी शास्त्री मेडिकलमध्ये जाऊन ड्रिंक्सचा ग्लास काऊंटरवर आपटतात आणि म्हणतात '2 कफ सिरप ऑन द रॉक्स'

हेही वाचा: MI vs DC : 'सचिनचा मुलगा असणे गुन्हा आहे काय?'

रवी शास्त्रींनी शुक्रवारी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून काही अतरंगी कपड्यातील, वृद्ध महिलेसोबतचे फोटो शेअर केले होते. यानंतर ट्विटवर त्यांच्यावर खूप मीम्स देखील झाले. त्यांनी हे फोटो शेअर करताना 'गुड मॉर्निंग हा एक पर्याय आहे. जर तुम्ही रात्रभर झोपलाच नसाल तर.' यानंतर दुसरा फोटो शेअर करत त्याने माझे कुटुंबीय मुंबईत राहतात आणि मी क्षणांमध्ये राहतो.'

Web Title: Ravi Shastri New Cred App Advertisement Gone Viral

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top