
धोनीच्या निवृत्तीवेळी ड्रेसिंग रुममध्ये काय झाले; शास्त्रींनी सांगितला घटनाक्रम
भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) निवृत्तीनंतर रोज कोणते ना कोणते वक्तव्य करत आहेत. भारतीय क्रिकेट वर्तुळात सध्या सुरु असलेल्या वादांच्या पार्श्वभूमीवर रवी शास्त्रींच्या प्रत्येक वक्तव्याची बातमी होत आहे. शास्त्रींनी नुकतेच भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni) संदर्भात वक्तव्य केले आहे.
एमएस धोनीने 30 डिसेंबर 2014 ला ऑस्ट्रेलिया विरुद्धची मेलबर्न कसोटी (Melbourne Test) ड्रॉ झाल्यानंतर कसोटी क्रिकेटमधून अचानकपणे निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली होती. रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी धोनीने निवृत्ती (MS Dhoni Test Retirement) घेण्याच्या घोषणेवेळी ड्रसिंग रुममध्ये काय काय घडले याचा खुलासा केला.
हेही वाचा: Video: गोल्डन डक मिळालेल्या पुजाराची द्रविडने का थोपटली पाठ?
स्टार स्पोर्ट्सशी बोलताना रवी शास्त्री यांनी धोनीच्या निवृत्तीचा घटनाक्रम सांगितला. ते म्हणाले, 'धोनीला विराट कोहली (Virat Kohli) संघाचे नेतृत्व करण्यास तयार झाला आहे हे माहिती होते. त्यामुळे धोनीने अचानक निवृत्तीचा निर्णय घेतला.'
ते पुढे म्हणाले, 'धोनीला माहित होते की संघाचे नेतृत्व आता कोणाकडे द्यायचे आहे. तो फक्त याची घोषणा करण्याची योग्य वेळ शोधत होता. कारण त्याला माहिती होते की त्याचे शरीर आता कितपर्यंत साथ देत आहे. त्याला त्याच्या मर्यादित षटकांच्या कारकिर्दिवर लक्ष केंद्रीत करायचे होते. ज्यावेळी धोनीच्या शरिराने त्याला आता बस असे सांगितले त्यावेळी त्याने क्षणाचाही विलंब न करता निर्णय घेऊन टाकला.' (MS Dhoni Test Retirement)
हेही वाचा: अॅशेस मालिकेला लागले कोरोनाचे ग्रहण
रवी शास्त्रींनी धोनीने आपल्या कसोटीतून निवृत्तीचा निर्णय कशा प्रकारे सांगितला याचा खुलासा केला. ते म्हणाले, 'मेलबर्नमध्ये धोनीने (MS Dhoni) सर्वांनाच धक्का दिला. तो माझ्या जवळ आला आणि मला म्हणाला की रवी भाई मला संघातील खेळाडूंबरोबर काहीतरी बोलायचे आहे. मी त्याला म्हणालो हो नक्की. त्यावेळी मला वाटले की आम्ही कसोटी ड्रॉ केली आहे. आम्ही शेवटच्या दिवशी फलंदाजी करत सामना ड्रॉ करण्यात यश मिळवले होते. याबद्दल धोनी काहीतरी बोलेल असे वाटत होते.'
शास्त्री पुढे म्हणाले, 'धोनी आला आणि त्याने मी कसोटी क्रिकेट खेळणे थांबवत आहे असे सांगितले. मी ड्रेसिंग रुममधील सर्वांचे चेहरे पाहिले. सर्वांनाच धक्का बसला होता. मात्र एमएस धोनी हा असाच आहे. धक्के देणारा.'
Web Title: Ravi Shastri Reveal What Happened In Dressing Room During Ms Dhoni Announced Test Retirement
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..