
IPLमध्ये पहिलेच अर्धशतक झळकावणाऱ्या अश्विनने त्याच्या रणनितीचा केला खुलासा
आयपीएलमध्ये बुधवारी दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात मॅच खेळवण्यात आली. विशेष म्हणजे आयपीएलच्या इतिहासात कधी जे घडल नव्हतं ते या सामन्यात घडलं असल्याचे पाहायला मिळाले. राजस्थान रॉयल्सचा ऑफ-स्पिन अष्टपैलू रविचंद्रन अश्विनने आयपीएल २०२२ मध्ये दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध पहिले अर्धशतक ठोकले. त्याच्या या कामगिरीची चर्चा सध्या क्रिकेट जगतात रंगली आहे. अशातच, अश्विनने स्वतः यासंदर्भात खुलासा केला आहे.
हेही वाचा: अश्विनच्या टी २० वर्ल्डकपमधील समावेशाबाबत गांगुलीने केला मोठा खुलासा
दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात तो क्रमांक 3 वर फलंदाजी करायला आला होता. अश्विनला या हंगामात अनेक सामन्यांमध्ये तिसऱ्या क्रमांकावर खेळण्याची संधी मिळाली आहे. पण त्याने त्याचा पुरेपूर फायदा करत त्याने पहिले टी-२० अर्धशतक पूर्ण केले.
स्वतःच्या खेळीसंदर्भात अश्विनने भाष्य केले आहे. तो म्हणाला, सत्रापूर्वी मला सांगण्यात आले होते की, फलंदाजीसाठी तुला वरच्या क्रमांकावर पाठवण्यात येणार आहे. मी काही अभ्यास मॅचदेखील खेळले होते. ज्यामध्ये मी डावाची सुरुवात केली होती.
हेही वाचा: आर. अश्विनच्या अर्धशतकवर पत्नी प्रीतिची रिअॅक्शन व्हायरल! पाहा फोटो
मी फलंदाजी करण्यासाठी खुप मेहनत घेतली आहे. आणि त्याचा मला फायदा होत असल्याचे पाहून समाधान मिळत असल्याचे मत अश्विनने व्यक्त केले आहे. मात्र, संघाला विजय मिळवून देऊ शकलो नसल्याची खंत त्याने यावेळी व्यक्त केली.
या सामन्यात रविचंद्रन अश्विनने 38 चेंडूत 50 धावांची शानदार खेळी खेळली. त्यात 4 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश होता. मात्र, या सामन्यात त्याची खेळी वाया गेली. कारण, त्याचा संघाला दिल्ली कॅपिटल्सकडून 8 विकेटने पराभव स्वीकारावा लागला. प्रथम फलंदाजी करताना राजस्थान रॉयल्सने दिल्ली कॅपिटल्ससमोर 161 धावांचे लक्ष्य ठेवले होते जे दिल्ली कॅपिटल्सने 18.1 षटकांत पूर्ण केले आहे.
Web Title: Ravichandran Ashwin Says Come On Top Order For Batting Is Plan Rajasthan Royals
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..