
आर. अश्विनच्या अर्धशतकवर पत्नी प्रीतिची रिअॅक्शन व्हायरल! पाहा फोटो
IPL Ashwin Wife Prithi Reaction: आयपीएलमध्ये बुधवारी दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना खेळला गेला. सामन्यात असे काही घडले, जे आजच्या आधी आयपीएलच्या इतिहासात कधीही घडले नव्हते. राजस्थान रॉयल्सचा ऑफ-स्पिन अष्टपैलू रविचंद्रन अश्विनने आयपीएल २०२२ मध्ये दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध अर्धशतक ठोकले. त्यानंतर त्यांच्या पत्नी प्रीतीची रिएक्शन सोशल मीडियावर रिअॅक्शन व्हायरल होत आहे. राजस्थान रॉयल्सने स्वतः ट्विटरवर त्यांच्या पोस्टद्वारे हा संस्मरणीय क्षण शेअर केला आहे.(Ravichandran Ashwin Wife Prithi Narayanan Reaction)
हेही वाचा: CSK आणि जडेजा यांच्यात वाद ? संघाने इन्स्टाग्रामवरून केल अनफॉलो
भारताचा ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनचे टी-20 कारकिर्दीतील हे पहिलेच अर्धशतक ठरले आहे. दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात तो क्रमांक 3 वर फलंदाजी करायला आला होता. अश्विनला या हंगामात अनेक सामन्यांमध्ये तिसऱ्या क्रमांकावर खेळण्याची संधी मिळाली आहे. पण आज त्याचा पुरेपूर फायदा करत त्याने पहिले टी-२० अर्धशतक पूर्ण केले. या सामन्यात रविचंद्रन अश्विनने 38 चेंडूत 50 धावांची शानदार खेळी खेळली. त्यात 4 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश होता. रविचंद्रन अश्विनने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध अर्धशतक झळकावताच त्याची पत्नी प्रीतीची रिअॅक्शन पाहण्यासारखी होती. अश्विनने अर्धशतक पूर्ण करताच त्याची पत्नी हसताना दिसली आणि टाळ्या वाजवून अश्विनला प्रोत्साहन दिले.
हेही वाचा: 'लिंबू मिरची कुठे आहे' राजस्थान रॉयल्सच्या त्या ट्विटची चर्चा
रविचंद्रन अश्विनने या सामन्यात भलेही अर्धशतक केले असेल, परंतु या सामन्यात त्याचा संघाला दिल्ली कॅपिटल्सकडून 8 विकेटने पराभव स्वीकारावा लागला. प्रथम फलंदाजी करताना राजस्थान रॉयल्सने दिल्ली कॅपिटल्ससमोर 161 धावांचे लक्ष्य ठेवले होते जे दिल्ली कॅपिटल्सने 18.1 षटकांत पूर्ण केले आहे.
Web Title: Ravichandran Ashwin Wife Prithi Narayanan Reaction First T20 Fifty Vs Dc Ipl 2022
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..