टीम इंडिया अन् BCCI ची नवी डोकेदुखी, T20 World Cup च्या तयारीत अडथळे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Team India T20 World Cup

टीम इंडिया अन् BCCI ची नवी डोकेदुखी, T20 World Cup च्या तयारीत अडथळे

Team India T20 World Cup : भारतीय संघ सध्या आशिया चषक 2022 मध्ये खेळण्यात व्यस्त आहेत परंतु टीमच्या नजरा पुढील महिन्यात होणाऱ्या T20 विश्वचषकाकडे आहेत. स्पर्धेला अजून एक महिन्याहून अधिक कालावधी बाकी आहे. पण ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या संघांनी तयारी सुरू केली असून त्यांच्या संघाची ही घोषणा केली आहे. सध्या आशिया चषक जिंकण्यावर लक्ष केंद्रित करणार्‍या टीम इंडियावर सर्वांच्या नजरा लागल्या आहेत, पण भारतीय संघाला दुखापतीचे ग्रहण लागले आहे.

हेही वाचा: Ravindra Jadeja : पाकिस्तान विरूद्धच्या सामन्यापूर्वी भारताला मोठा धक्का

टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजा दुखापतीमुळे उर्वरित आशिया कपलाच मुकणार आहे. टीम इंडियाला पहिले दोन सामने जिंकण्यात मदत केल्यानंतर दुखापतीमुळे तो बाहेर पडला आहे. त्याच्या उजव्या गुडघ्याला दुखापत झाली असल्याची माहिती बीसीसीआयने आज दिली. रविंद्र जडेजा सध्या बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली आहे. अक्षर पटेलला आशिया कपसाठी स्टँड बाय म्हणून संघासोबत ठेवण्यात आले होते. तो लवकरतच दुबईत संघात दाखल होईल.

हेही वाचा: Dhanashree Verma : युझवेंद्रची पत्नी धनश्री रूग्णालयात दाखल! चाहत्यांसाठी दिला खास संदेश

बुमराह आणि हर्षलनंतर आता जडेजाच्या दुखापतीमुळे परिस्थिती आणखी कठीण झाली आहे. ही दुखापत किती गंभीर आहे आणि त्यातून सावरायला किती वेळ लागेल, हे बोर्डाने अजून सांगितलेले नाही. जडेजाला कधी दुखापत झाली हेही बोर्डाने सांगितलेले नाही, मात्र गेल्या दीड महिन्यात दुसऱ्यांदा या स्टार अष्टपैलू खेळाडूला गुडघ्याची दुखापत झाली आहे. यापूर्वी जुलैच्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर जडेजा दुखापतीमुळे पहिल्या दोन एकदिवसीय मालिका खेळू शकला नव्हता. तर टी-20 मालिकेतील सुरुवातीच्या सामन्यांमधूनही तो बाहेर होता.

जडेजाच्या दुखापतीचा टीम इंडियाच्या आगामी आशिया चषकातील सामन्यांवर कसा परिणाम होईल, हे काही दिवसांतच कळेल. पण टी-20 विश्वचषकापूर्वी टीम इंडियाच्या दुखापतींमध्ये वाढ होत असल्याने संघ व्यवस्थापन आणि निवड समिती चिंतेत आली आहे. संघाला आधीच स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि हर्षल पटेलशिवाय आशिया चषक स्पर्धेत जावे लागले. हे दोघेही विश्वचषकासाठी उपलब्ध असतील की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Web Title: Ravindra Jadeja Injured Indian Cricket Team Injury Jasprit Bumrah And Harshal Patel Team India T20 World Cup Selection Sports Cricket

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..