esakal | ICC Test Rankings : जड्डूसह साउदीला चांगल्या कामगिरीच बक्षीस!
sakal

बोलून बातमी शोधा

Ravindra Jadeja

ICC Test Rankings: जड्डूसह साउदीला चांगल्या कामगिरीच बक्षीस!

sakal_logo
By
सुशांत जाधव

ICC Test Ranking : आयसीसीच्या कसोटी टेस्ट रँकिंगमध्ये रविंद्र जडेजाला मोठी झेप घेतली आहे. अष्टपैलू क्रिकेटर्सच्या यादीत जड्डू स्टोक्सला मागे टाकून दुसऱ्या स्थानावर पोहचलाय. रविंद्र जडेजाच्या खात्यात आता 386 गुण आहेत. बेन स्टोक्स 385 गुणांसह तिसऱ्या स्थानावर घसरला आहे. वेस्ट इंडिजचा जेसन होल्डर या यादीत अव्वलस्थानी आहे. भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व करताना अष्टपैलू कामगिरी करुन लक्षवेधी ठरलेला आर अश्विन चौथ्या स्थानावर कायम आहे. त्याच्या खात्यात 353 गुण जमा आहेत.

गोलंदाजी क्रमावरीत टिम साउदीला मोठा फायदा झालाय. इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यातील दमदार कामगिरीच्या जोरावर त्याने सहाव्या स्थानावरुन तिसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. इंग्लंड विरुद्ध लॉर्ड्सच्या मैदानात झालेल्या कसोटी सामन्यात साउदीने 7 विकेट घेतल्या होत्या. या कामगिरीनंतर त्याच्या खात्यात 838 गुण जमा झाले आहेत. गोलंदाजांच्या क्रमवारीत भारतीय संघाचा फिरकीपटू आर अश्विनने दुसरे स्थान कायम राखले आहेत. त्याच्या नावे 850 गुण आहेत.

हेही वाचा: चुकीला माफी नाही;दिग्गज भारतीय क्रिकेटरचा पंतप्रधानांना टोला

आयसीसीच्या कसोटी क्रिकेट क्रमवारीत ऑस्ट्रेलियन पॅट कमिन्स पहिल्या स्थानावर आहे. त्याने 908 गुण मिळवले आहेत. या यादीत न्यूझीलंड संघाचा नील वॅगनर चौथ्या स्थानावर असून त्याच्या खालोखाल जोश हेजलवुडचा समावेश होता. इंग्लंडचा जलदगती गोलंदाज जेम्स अँडरसन 6 व्या स्थानावर आहे. इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना 10 जूनपासून सुरु होणार असून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपपूर्वी या सामन्यानंतर रँकिंगमध्ये बदल पाहायला मिळू शकतो. इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला कसोटी सामना अनिर्णित राहिला होता. न्यूझीलंडचा संघ वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या फायनलपूर्वी विजय मिळवून ताकद दाखवण्याचा प्रयत्न करेल तर दुसरीकडे इंग्लंडचा संघ सामना जिंकून मालिका खिशात घालण्यासाठी उत्सुक असेल.

हेही वाचा: ऑलिम्पिकसाठी भारत प्रबळ दावेदार; गुजरातने कसली कंबर

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात 18 ते 22 जून दरम्यान वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल रंगणार आहे. या इंग्लंड विरुद्धच्या दोन सामन्याची मालिका न्यूझीलंडला फायद्याचे ठरू शकतो. दुसरीकडे भारतीय संघ न्यूझीलंडची कामगिरी पाहून त्यांच्याविरुद्ध प्लॅन आखू शकतो.