esakal | ऑलिम्पिकसाठी भारत प्रबळ दावेदार; गुजरातने कसली कंबर
sakal

बोलून बातमी शोधा

 olympic games 2036

ऑलिम्पिकसाठी भारत प्रबळ दावेदार; गुजरातने कसली कंबर

sakal_logo
By
सुशांत जाधव

विकसनशील देशांची मक्तेदारी असलेल्या ऑलिम्पिक गेम्सचे भारतात आयोजन करण्याची तयारी सुरु असल्याची चर्चा सध्या जोर धरत आहे. सध्याच्या घडीला 2032 पर्यंत ऑलिम्पिक स्पर्धेचे यजमानपद पक्के झाले असून 16 वर्षानंतर भारताचे ऑलिम्पिक आयोजनाची स्वप्नपूर्ती होऊ शकते. 1896 पासून ऑलिम्पिक स्पर्धा होत असून जगातील मानाच्या स्पर्धेच्या आयोजनाच्या शर्यतीत भारताला प्रबळ दावेदार मानले जात आहे.

येत्या काही महिन्यात भारतातील ऑलिम्पिक गेम्सच्या आयोजनासंदर्भातील चित्र स्पष्ट होईल. गुजरातमधील अहमदाबादमध्ये ऑलिम्पिक स्पर्धा घेण्याची जोरदार तयारी सुरु करण्यात आलीये. अहमदाबाद शहरी विकास प्राधिकरणाने मंगळवारी ऑलिम्पिक गेम्सनुसार स्पोर्ट्स आणि नॉन- स्पोर्ट्स इंफ्रास्ट्रक्चर एनालिसिससाठी टेंडर जारी केले आहे. पुढील तीन महिन्यात यासंदर्भात अहवाल तयार करण्यात येणार आहे.

हेही वाचा: जिमीनं ब्रॉडला म्हटलं होतं लेस्बियन! ट्विट व्हायरल

2028 पर्यंत ऑलिम्पिकचे यजमानपद पक्के

2028 पर्यंत ऑलिम्पिक गेम्सच्या आयोजनाचा निर्णय झालेला आहे. 2032 साठीच्या ऑलिम्पिकसाठी पुढील महिन्यात दावा करता येणार आहे. 2020 च्या ऑलिम्पिक गेम्स या जपानमधील टोकियोमध्ये होणार होत्या. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही स्पर्धा यंदाच्या वर्षी होणार आहे. 2024 ऑलिम्पिक स्पर्धा पॅरिस तर 2028 मध्ये लॉस अँजेल्स येथे ऑलिम्पिक स्पर्धा पार पडणार आहे. 2032 च्या ऑलिम्पिक यजमानपदाचा निर्णय जवळपास झाला आहे. ऑलिम्पिक कमिटीने ऑस्ट्रेलियाच्या ब्रिसबेनला पसंती दिली असून अधिकृत घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही.

हेही वाचा: French Open : सेमीफायनलमध्ये नदाल-जोकोव्हिच यांच्यात फाईट?

2036 मधील ऑलिम्पिक गेमसाठी भारत प्रबळ दावेदार

2036 ओलिम्पिक गेम्सचे आयोजन करण्यासाठी भारत प्रबळ दावेदार मानला जात आहे. भारताची जर्मनी, कतर, इंडोनेशिया, हंगरी, उत्तर आणि दक्षिण कोरिया हे देश शर्यतीत असतील. याशिवाय ब्रिटेनने देखील स्पर्धेच्या यजमानपदाच्या शर्यतीत उतरु शकते.