Kapil Dev: 'आजकाल वेगवान गोलंदाज फक्त 30 चेंडू...', टीम इंडियावर देव भडकले

kapil dev no nonsense take on india recent string of injuries
kapil dev no nonsense take on india recent string of injuriessakal

Kapil Dev on Indian Fast Bowlers injuries : भारतीय क्रिकेट संघ सध्या खेळाडूंच्या दुखापतीमुळे चांगलाच त्रस्त झाला आहे. विशेषत: वेगवान गोलंदाजांच्या दुखापतीमुळे तर जास्त आहे. स्टार जसप्रीत बुमराह गेल्या वर्षी सप्टेंबरपासून क्रिकेटच्या मैदानापासून दूर आहे. याआधी स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्यालाही दुखापतीमुळे बराच काळ बाहेर होता. भारताचा विश्वचषक विजेता कर्णधार कपिल देव यांनी अलीकडेच भारतीय गोलंदाजांना सतत दुखापत का होत आहे हे सांगितले आहे आणि त्यावर चांगलेच भडकले आहेत.

kapil dev no nonsense take on india recent string of injuries
IND vs NZ: टीम इंडियासाठी न्यूझीलंड बनली डोकेदुखी! आधी क्रिकेट मग हॉकीत तोडते भारताचे हृदय

1983 मध्ये भारताला विश्वचषक जिंकून देणारा कर्णधार कपिल देव यांना याबाबत विचारले असता ते म्हणाले की, आजच्या काळात अधिक क्रिकेट खेळल्या जात आहे. त्यामुळे खेळाडू जखमी होत आहेत. वेगवान गोलंदाज जखमी झाल्यावर त्यांनी नेटमध्ये अधिकाधिक गोलंदाजी करावी पण आजचे वेगवान गोलंदाज नेटमध्ये फक्त 30 चेंडू टाकतात असे सांगितले.(kapil dev no nonsense take on india recent string of injuries)

kapil dev no nonsense take on india recent string of injuries
IND vs NZ: 'न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यापेक्षा रोहित अन् विराटने रणजी क्रिकेट खेळावी...'

भारतीय खेळाडूंच्या दुखापतींबाबत कपिल देव एका वृत्तसंस्थेशी बोलताना म्हणाले, “आता एका वर्षात 10 महिन्यांहून अधिक क्रिकेट खेळल्या जात आहे. तुम्ही जितके जास्त खेळाल तितक्या जास्त दुखापती होतील. क्रिकेट हा साधा खेळ नाही. तुम्हाला ऍथलेटिक असणे आवश्यक आहे. प्रत्येक परिस्थितीशी जुळवून घेणे सोपे नसते. त्यामुळे शरीरावर जखमा होतात आणि तुम्ही दुखापती होता.

कपिल देव पुढे म्हणाले, “तुम्ही नेटमध्ये जितकी जास्त गोलंदाजी कराल तितके तुमचे स्नायू विकसित होतात. मला सांगण्यात आले आहे की आजकाल वेगवान गोलंदाजांना फक्त 30 चेंडूची परवानगी आहे. जेव्हा ते व्यावसायिक स्तरावर खेळण्यासाठी इतका ताण घेतात तेव्हा त्याचा शरीरावर परिणाम होतो. त्याला इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा जास्त गोलंदाजी करावी लागते.

kapil dev no nonsense take on india recent string of injuries
Parshavi Chopra: W, W, W, W... श्रीलंकेला नाचवणारी 16 वर्षाची पार्शवी चोप्रा आहे तरी कोण?

टीम इंडियाने 2023 वर्षाची सुरुवात चांगली केली. टी-20 मालिकेत श्रीलंकेचा 2-1 असा पराभव केला. त्यानंतर वनडे मालिकेत व्हाईटवॉश झाला. न्यूझीलंडचा संघ भारत दौऱ्यावर आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघाने वनडे मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. अखेरचा वनडे मंगळवारी इंदूरमध्ये खेळला जाणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com