Video: रवींद्र जडेजाने हातात घेतली तलवार आणि...

वृत्तसंस्था
मंगळवार, 14 एप्रिल 2020

भारतीय क्रिकेट संघातील अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाने हातामध्ये तलवार घेतल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, तो चर्चेत आला आहे.

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघातील अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाने हातामध्ये तलवार घेतल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, तो चर्चेत आला आहे.

लॉकडाऊनच्या काळात 'गुगल पे'ची खास सेवा...

कोरोनाव्हायरसमुळे लॉकडाऊन जाहीर करण्यात आला असून, क्रीडा स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहे. क्रिकेटचे सामनेही रद्द झाल्यामुळे क्रिकेटपटू सध्या घरांमध्येच आहेत. क्रिकेटपटू घरामध्ये बसून आपले व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड करताना दिसतात. रवींद्र जडेजाने हातात तलवार घेऊन आपली कला दाखवली आहे. संबधित व्हिडिओ त्याने ट्विटरवर अपलोड करताना 'तलवार आपली चमक गमावू शकतो. मात्र, आपल्या मालकाचा अपमान करणार नाही. राजपूत मुलगा', असे शीर्षक दिले आहे. मैदानावर तलवारबाजी करण्याची संधी मिळत नसल्याने जडेजाने आपल्या फार्म हाऊसवर तलवारबाजी केली आहे.

दरम्यान, ऑस्ट्रेलियन फलंदाज डेव्हिड वॉर्नरने काही दिवसांपूर्वी आयपीएलचा एक थ्रोबॅक व्हिडिओ अपलोड केला होता. यामध्ये जडेजाप्रमाणे तो बॅट हवेत फिरवताना होता. यावेळी वॉर्नरने चाहत्यांना जडेजासारखी तलवार बाजी केली का? असा प्रश्न विचारला होता.

नवरदेवाला कोरोना झाल्याचे समजले अन्...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ravindra jadeja swordsmanship in lockdown video viral