
यंदाच्या आयपीएल हंगामात अंतिम सामन्यात आरसीबीने पंजाब किंग्जला हरवून विजेतेपद पटकावलं. १८ वर्षांनी अखेर आरसीबीचा विजेतेपदाचा दुष्काळ संपुष्टात आला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडलेल्या सामन्यात आरसीबीने पंजाबला ६ धावांनी हरवलं. आय़पीएल स्पर्धेदरम्यान आरसीबीच्या चाहत्यांचे काही फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले होते. यात एका महिला चाहतीने हातात एक बोर्ड घेतल्याचा फोटो व्हायरल झाला होता. त्यात महिलेनं म्हटलं होतं की, आरसीबी फायनल जिंकली नाही तर मी पतीला घटस्फोट देईन. आता आरसीबीने आयपीएल जिंकल्यानंतर तिची प्रतिक्रिया समोर आलीय.